पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेन मागील तीन दिवसांपूर्वी आलेला महापूर दशकातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूरामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच व्हॅलेन्सिया शहराला या पुराचा मोठा फटका बसला आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Flood In Spain )
व्हॅलेन्सियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, रस्ते बुडले आहेत आणि आपत्कालीन सेवांना प्रभावित भागात पोहोचण्यात अडचण येत आहे. व्हॅलेन्सिया शहरातील न्यायालयाचे रूपांतर तात्पुरत्या शवागारात करण्यात आले आहे. ला टोरे परिसरात पाणी चार फुटांपर्यत आहे. तसेच स्वयंसेवक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. भूमिगत पार्किंगमध्ये सात मृतदेह सापडले.
व्हॅलेन्सिया भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. येथे सुमारे 50 लाख लोक राहतात. या शहरात पुरामुळे आतापर्यंत 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेवटच्या वेळी स्पेनमध्ये 1973 मध्ये इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच यावेळच्या पावसाने 50 वर्षांचा विक्रम मोडला आहे. तोपर्यंत सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाला होता. 1957 मध्ये व्हॅलेन्सियामध्ये असा भीषण पूर आला होता, ज्यात 81 जणांना जीव गमवावा लागला होता. (Flood In Spain)
स्पेनच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, अँडालुसियाच्या ह्युएल्वा किनाऱ्यासाठी लाल इशारा जारी करण्यात आला आहे. स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी संकट समितीचे अध्यक्ष केले आणि मदत कार्यासाठी संसाधने देण्याचे आश्वासन दिले आहे. संरक्षण मंत्रालयाने व्हॅलेन्सियाला मदत पुरवठा करण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.