

Pakistan MP Cried in parliament after Operation Sindoor
इस्लामाबाद : भारतीय लष्कराने पीओके (पाक अधिकृत काश्मीर) आणि पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये ऑपरेशन सिंदूरमधून एअर स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या या हल्ल्याची पाकिस्तानातील अनेकांनी धास्ती घेतली आहे.
यात पाकिस्तानच्या संसदेतील खासदारांचाही समावेश आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सत्ताधारी पाकिस्तानी मुस्लीम लीग (पीएमएल-एन) चे खासदार असलेले ताहिर इक्बाल हे चक्क पाकिस्तानच्या संसदेत रडताना दिसून आले. हे अल्लाह आमचे रक्षण कर, असे म्हणत खासदार ताहिर इक्बाल यांनी टाहो फोडला.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात सध्या भीतीचे वातावरण आहे. भारताकडून पुन्हा हल्ला होऊ शकतो या भीतीने पाकिस्तान हादरला आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये पीएमएलएन (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) पक्षाचे खासदार आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय ताहिर इक्बाल भावूक झाले. "अल्लाह आमचे रक्षण करो," असे म्हणत त्यांनी त्यांनी संसदेत टाहो फोडला.
दरम्यान, बुधवारी सकाळी लाहोरमधील पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम स्थळावर दोन ते तीन स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि, सायंकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन भारतानेच पाकची लाहोरमधील एअर डिफएन्स सिस्टिम उद्धवस्त केल्याचे जाहीर केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या सुमारे 15 भारतीय ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. पण भारताने पाकिस्तानचा हा हल्ला पूर्णपणे निष्प्रभ केला. एस-400 या रशियन बनावटीच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्सचा हल्ला निष्प्रभ ठरवला.
भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानातील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह अनेक नेते घाबरले आहेत.
बुधवार, 7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने पीओकेसह पाकिस्तानातील अनेक भागांवर हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ जमीनदोस्त केले. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या काही सैन्य तळांवर हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला.
भारताने पाडले पाकिस्तानी क्षेपणास्त्र
पाकिस्तानने भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, त्यापैकी 7 शहरे पंजाबमधील होती. भारताच्या एस-400 प्रणालीने हवेतच पाकिस्तानी क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केले.
गुरुवार, 8 मे 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
या बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की हा एक सुरू असलेला मोहीम आहे. जर भारताच्या लक्ष्यित हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने काही लष्करी कारवाई केली, तर भारत त्याला कठोर प्रत्युत्तर देईल.
भारतीय लष्कराने पाकिस्तान व पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचे तळ – बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचे अड्डे – मुरिदके यांचा समावेश आहे.