Oil gas prices rise: तेल, गॅस दर पुन्हा भडकले

उत्पादन केंद्रांवर पहिल्यांदाच थेट निशाणा; जागतिक बाजारात खळबळ
Oil gas prices rise
Oil gas prices rise: तेल, गॅस दर पुन्हा भडकलेPudhari
Published on
Updated on

दुबई/तेहरान : अमेरिका-इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने प्रथमच थेट तेल आणि गॅस उत्पादन केंद्रांवर हल्ले केल्याने जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत 3 टक्के वाढून प्रतिबॅरल 103.2 डॉलरवर पोहोचली, तर युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत ती जवळपास 50 टक्के वाढली आहे. घाऊक गॅस दरही सुमारे 3 टक्के वाढून 52 प्रतिमेगावॅट तास झाले आहेत.

इराणने यापूर्वी रिफायनरी, साठवण टर्मिनल्स आणि बंदरांवर हल्ले केले होते; मात्र आता उत्पादन केंद्रांवर थेट हल्ला केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीने दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‌‘शाह‌’ गॅसफील्डवर ड्रोन हल्ला झाला असून तेथे आग लागली आहे. नुकसानाचे मूल्यांकन सुरू असून कामकाज तात्पुरते बंद आहे.

याचबरोबर इराकमधील मज्नून तेलक्षेत्र आणि यूएईतील फुजैराह बंदर व तेल साठवण सुविधा देखील हल्ल्याचे लक्ष्य ठरले. फुजैराहजवळ एका तेल टँकरलाही अज्ञात प्रक्षेपास्त्राने धडक दिल्याने आग लागली. या बंदरातून दररोज 10 लाख बॅरलपेक्षा अधिक तेल निर्यात होते; परंतु सध्या ती थांबवण्यात आली आहे. या हल्ल्यांमुळे यूएईचा कच्च्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला असून उत्पादन अर्ध्याहून अधिक कमी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news