

Nvidia CEO Jensen Huang resigns : "मी कंपनीचा अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य या पदांचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे," अशी घोषणा एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी आज (दि. ११) केली.
चिनी ‘हेर’ असल्याचा संशय असणार्या ॲलिस हुआंग महिलेसोबतच्या विवाहबाह्य संबंधामुळे हुआंग वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. या प्रकरणी त्यांनी आपली पती लोरी हुआंगसह कंपनीच्या कर्मचार्यांचीही माफीही मागितली आहे. दरम्यान जेन्सेन हुआंग यांचे एनव्हिडियामधील कर्मचारी आणि आरोग्य सेवा विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबतही विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले होते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एनव्हिडिया आता कायमस्वरूपी उत्तराधिकार्याचा शोध घेत आहे. तोपर्यंत मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) कोलेट क्रेस या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळतील.
जेन्सेन हुआंग यांनी १९९३ मध्ये एनव्हिडियाची सह-स्थापना केली होती. ते अजूनही कंपनीचे चौथे सर्वात मोठे गुंतवणूकदार असून, त्यांची कंपनीत सुमारे ३.६१ टक्के भागीदारी आहे.एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “संचालक मंडळाने आज जाहीर केले आहे की, जेन्सेन हुआंग यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य या पदांचा त्वरित प्रभावाने राजीनामा दिला आहे.”
“एनव्हिडियाच्या सध्याच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांनी अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे. कायमस्वरूपी उत्तराधिकार्याची नियुक्ती होईपर्यंत, कोलेट क्रेस त्यांच्या सध्याच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी या पदांवरील जबाबदाऱ्या सांभाळण्यासोबतच अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतील. संचालक मंडळ आता कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकार्याचा शोध घेत आहे.”
जेन्सन हुआंग हे मूळचे तैवानचे आहेत. ते वयाच्या नवव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाले. सध्या अमेरिकेचे नागरिक असणारे हुआंग हे जगातील आघाडीची टेक कंपनी असलेल्या ‘एनव्हिडिया कॉर्पोरेशन’ (NVIDIA) चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. १९९३ मध्ये वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्रांतीचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली एनव्हिडियाने ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जागतिक टेक बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, रोबोटिक्स आणि स्वायत्त वाहनांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी करणाऱ्या हुआंग यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणना होते.
'द न्यूयॉर्क टाइम्स'ने २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं की, हुआंग हे एका चिनी गुप्तहेरच्या कटाचे लक्ष्य होते. या कटाचे समन्वय ॲलिस हुआंग उर्फ हुआंग ले नावाच्या एका व्यावसायिक महिलेने केले होते. तिने हुआंग यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. ती एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्स व गुप्त माहिती चीनच्या गुप्तचर विभागाला पुरवत होती. सिंगापूरस्थित डेटा सेंटर कंपनी 'मेगास्पीड'मधील उच्चपदस्थ अधिकारी आणि चिनी नागरिक असलेली ॲलिस ही चीनसाठी गुप्त माहिती पुरवत होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी स्पष्ट केले आहे.
जेन्सन हुआंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये, संशयित चिनी गुप्तहेरासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. या ईमेलमध्ये, हुआंग यांनी नमूद केले की, त्यांना आपल्या कुटुंबाची आणि सर्व कर्मचाऱ्यांची माफी मागायची आहे.
"संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग हे परदेशी गुप्तचर यंत्रणेच्या प्रयत्नांचे लक्ष्य बनले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे, असे एनव्हिडिया कंपनीने जारी निवेदनात म्हटलं होते की, या प्रकरणाची चौकशीत सर्व उपलब्ध माहितीची तपासणी केली जाईल. संचालक मंडळ अमेरिकेच्या राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देते. एनव्हिडिया आणि तिच्या भागधारकांच्या हितासाठी सर्वोच्च आहे."