‘एनविडिया’ने आणला नवा ‘ग्रूट एन1’ रोबो

ग्रूट एन1 हे मानवी स्मरणशक्ती आणि विचारसरणीवर आधारित दोन प्रकारच्या विचारपद्धतींनी सुसज्ज
 Nvidia new robot
sidharthjoseph01
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील ’एनविडिया’ या कंपनीने ह्युमनॉईड म्हणजेच मानवाकृती रोबोट्सच्या विकासाला गती देण्यासाठी नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर केले आहे. कंपनीने अद्ययावत असा ’ग्रूट एन1’ हा रोबो तयार केला आहे जो पूर्णपणे सानुकूलनीय (customizable) फाउंडेशन मॉडेल असून ते सामान्यीकृत (generalized) ह्युमनॉईड बुद्धिमत्तेसाठी तयार करण्यात आले आहे.

हे मॉडेल कंपनीद्वारे प्री-ट्रेन केले जाईल आणि ते जगभरातील रोबोटिक्स विकसकांसाठी उपलब्ध असेल, ज्यामुळे विविध उद्योगांमध्ये वाढणार्‍या 50 दशलक्षपेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या तुटवड्याला तंत्रज्ञानाद्वारे भरून काढता येईल.कंपनीचे संस्थापक आणि CEO, जेन्सेन हुआंग म्हणतात, ‘जनरलिस्ट रोबोटिक्सचा युग आला आहे. ग्रूट एन1 हे मानवी स्मरणशक्ती आणि विचारसरणीवर आधारित दोन प्रकारच्या विचारपद्धतींनी सुसज्ज आहे: 1. वेगवान, अंतःप्रेरणात्मक (reflex- based) कृती करण्यासाठी सक्षम व 2. विचारपूर्वक, विश्लेषणात्मक निर्णय घेणारी यंत्रणा. व्हिजन लँग्वेज मॉडेलद्वारे ते परिस्थितीचे आकलन करून योग्य कृती ठरवते, तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी अचूक, सतत हालचाल निर्माण करते. हे मॉडेल मानवाच्या हालचाली आणि कृतींच्या डेटावर प्रशिक्षित आहे, त्यामुळे रोबोटिक्स डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news