Nostradamus prediction : "आकाशातून महाविनाशाचा अग्निगोळा येईल..." : नॉस्त्रेदेमसचे भाकित पुन्‍हा चर्चेत का आले?

नोस्‍ट्रॅडॅमसची भयानक भविष्यवाणी 2025 अखेरीचा संदर्भ देत सोशल मीडियावर होतीय व्हायरल
Nostradamus prediction
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on
Summary

आजपर्यत नॉस्त्रेदेमसच्‍या भविष्यवाणीची सत्यता आणि अचूकता वादग्रस्त राहिली असली तरी श्रद्धाळू आणि चिकीत्‍सक दोघांमध्येही चितंना आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

Nostradamus prediction : ऑक्‍टोबर महिनाचा शेवटचा आठवडा आला की, नववर्षाच्‍या चाहुलीची चर्चा सुरु होते. आता नववर्ष २०२६ बरोबरच १६ व्‍या शतकातील फ्रेंच ज्‍योतिषी नॉस्त्रेदेमसचे जुने भाकित सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. आजपर्यत नॉस्त्रेदेमसच्‍या भविष्यवाणीची सत्यता आणि अचूकता वादग्रस्त राहिली असली तरी श्रद्धाळू आणि चिकीत्‍सक दोघांमध्येही चितंना आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोण होता नॉस्त्रेदेमस?

नॉस्त्रेदेमस हा मूळचा फ्रेंचमधील. त्‍याचे खरे नाव मिशेल डी असे होते. १५५५ मध्‍ये लेस प्रोफेटीज हे त्‍याचे पुस्‍तक प्रकाशित झाले. यामध्‍ये फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीकच्‍या पुरातन साहित्‍यातील ९४२ क्वाट्रेनचा (चारोळी) संग्रह होता. विशेष म्‍हणजे या चारोळी जाणूनबुजून अस्पष्ट होत्‍या. त्‍यामुळे त्‍याचे विविध अर्थही निघतात. आता "आकाशातून मोठ्या विनाशाचा एक आगीचा गोळा येईल,बदलाचे चिन्ह, अंत आणि नूतनीकरणाचा काळ." या चारोळीतून त्‍याचे अनुयायी संभाव्य उल्कापिंडाचा हल्ला, मोठ्या प्रमाणात युद्ध किंवा अगदी तांत्रिक आपत्तीचा संदर्भ म्हणून करत आहेत. काहीजण याचा संबंध हवामान बदल किंवा जागतिक अस्थिरतेशी जोडत दावा करत आहेत की, नॉस्ट्राडेमसने २०२५ च्या अखेरीस "अग्नी आणि अराजकता" चा काळ पाहिला होता.

Nostradamus prediction
नव्या नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी…चीनचे होणार तुकडे!

नॉस्त्रेदेमस भविष्‍यावाणी सामूहिक मानसशास्त्राबद्दल

"आकाशातून महाविनाशाचा अग्निगोळा येईल, बदलाचे चिन्ह, अंत आणि नूतनीकरणाचा काळ." या चारोळीतून कोणत्याही मूळ हस्तलिखितात या श्लोकाचे स्पष्टपणे त्या विशिष्ट वर्षाशी वर्णन केलेले नाही. इतिहासकारांनी यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे की, आधुनिक दुभाषी बहुतेकदा चालू घटना किंवा चिंतांशी जुळवून घेण्यासाठी तारखा जोडतात, ज्यामुळे भविष्यवाणी प्रत्यक्ष दूरदृष्टीपेक्षा सामूहिक मानसशास्त्राबद्दल अधिक असते.

Nostradamus prediction
नॉस्त्रेदेमसचे ‘हे’ भविष्य ठरणार खरे?

२०२५ हे वर्ष महाप्रलयाचे लक्ष वेधून घेत आहे का?

अलिकडच्या वर्षांत २०२५ च्या आसपासच्या भाकिते विशेषतः लोकप्रिय झाली आहेत. नॉस्त्रेदेमसच्या कथित भाकितासोबतच विविध ऑनलाइन पोस्ट आणि पुस्तके त्याला मानवतेसाठी 'मोठ्या बदलाचे वर्ष' म्हणूनही दावा करत आहेत. काही जण या भविष्यवाणीला हवामान बदल (climate change) आणि जागतिक अस्थिरतेशी जोडतात, की नॉस्त्रेदेमसने २०२५ च्या अखेरीस "अग्नी आणि अराजकतेचा" काळ पाहिला होता.

Nostradamus prediction
आता ऐका ‘एआय’ नॉस्त्रेदेमसची भविष्यवाणी!

सोशल मीडियावर काय दावा केला जात आहे?

सोशल मीडियाने नॉस्त्रेदेमसच्‍या भाकितावर पुन्‍हा एकदा खल सुरु झाला आहे. #Nostradamus2025 आणि #Endof2025 सारख्या हॅशटॅग्सना टिकटॉक (TikTok) आणि एक्स (X - पूर्वीचे ट्विटर) वर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नोस्त्रेदमसने उल्लेख केलेला "अग्निगोळा" म्हणजे अणुबॉम्बचा धोका, सौर वादळ (solar storm) किंवा मोठ्या अ‍ॅस्टरॉइडचा (Asteroid) आघात असू शकतो, असे व्हिडिओ यूजर्स शेअर करत आहेत.

Nostradamus prediction
Earth Images : अद्भूत सौंदर्य….आपली पृथ्‍वी एका चकमकदार रत्‍नासारखीच!

नॉस्त्रेदेमसच्‍या भाकिताबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांनी म्‍हटलं आहे की, अशा प्रकारचे साहित्‍य हे बहुतेकदा भविष्यसूचक अचूकतेपेक्षा सार्वजनिक भीती प्रतिबिंबित करतात. लोक जुन्या मजकुरांवर आधुनिक भाषेत चिंता व्‍यक्‍त करतात. इतिहासकारांनी यापूर्वीही स्‍पष्‍ट केले आहे की, नॉस्त्रेदेमस लेखन भाकित नोंदींपेक्षा काव्यात्मक आणि प्रतीकात्मक आहे. भाकितामध्ये कोणत्‍याही ठराविक वर्ष असे नमूद केलेले नाही. त्‍यामुळेच नोस्ट्रॅडॅमस भविष्‍यावाणी ही मानवी वर्तन, राजकारण आणि इतिहासाच्या चक्रीय स्वरूपावर कालातीत भाष्य म्हणून वापरले गेले होते. युद्धे, साथीचे रोग किंवा आपत्ती यासारख्या प्रमुख घटना घडल्यानंतर अनेक तथाकथित "अचूक" भाकिते पूर्वलक्षी अर्थाने अर्थ लावली गेली.

Nostradamus prediction
एक लघुग्रह येतोय पृथ्‍वी जवळ! नासाचे शास्‍त्रज्ञ म्‍हणाले...

लोक अजूनही अशा भाकिते का मानतात?

शतकांच्या संशयास्पदतेनंतरही स्ट्रॅडॅमसचे आकर्षण कमी झालेले नाही. त्याच्या भाकिते गोंधळलेल्या काळात गूढता आणि सुव्यवस्थेची भावना देतात. अनेकांना त्‍याच्‍या पुस्‍तकातील गूढ लिखाणाचा अर्थ जागतिक अशांतता निर्माण करणार्‍या घटनांशी लावतात. मानसशास्त्रज्ञ अगतात की, सामाजिक किंवा राजकीय अस्थिरतेच्या काळात भविष्यवाणीवर विश्वास वाढतो. जेव्हा लोकांना भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते तेव्हा ते शतकानुशतके जुन्या ग्रंथांमध्येही नमुने आणि चिन्हे शोधतात. नॉस्ट्राडेमसची काव्यात्मक अस्पष्टता ते विशेषतः सोपे करते.

image-fallback
२०२० मध्ये मंगळासाठी हेलिकॉप्‍टरचे उड्‍डाण : नासा

मानवी भीती आणि कल्पनेची प्रतिमा...

नॉस्त्रेदेमसच्या लेखनाला २०२५ मधील कोणत्याही वास्तविक घटनेशी जोडणारा कोणताही वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. नासाने (NASA) या वर्षासाठी पृथ्वीला धोकादायक ठरू शकणारे कोणतेही धूमकेतू किंवा उल्का निश्चित केलेले नाही. श्रद्धाळूंसाठी हे भाकित विनाशाऐवजी एखाद्या युगाच्या समाप्तीचे किंवा मोठ्या सामाजिक बदलाचे प्रतीक असू शकते. बहुतेक नॉस्त्रेदेमसच्या श्लोकांप्रमाणे, त्याचा अर्थ वस्तुस्थितीपेक्षा अर्थ लावण्यावर अवलंबून असतो. "आकाशातून आगीचा गोळा" मानवी भीती आणि कल्पनेची एक प्रतिमा आहे, विशेष म्‍हणजे ती सुमारे ५०० वर्षांपासून टिकून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news