

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची स्पेस एजन्सी ‘नासा’ एका लघुग्रहावर नजर ठेऊन आहेत. कारण हा लघुग्रह कदाचित पृथ्वीवर आदळू शकतो किंवा पृथ्वीजवळून जावू शकतो अशी शास्त्रज्ञांना शंका आहे. ‘2024 वायआर 4’ असे या लघूग्रहाचे नामकरण शास्त्रज्ञांनी केले आहे. युरोपीअयन स्पेस एजन्सी व नासाच्या वतीने हा उपग्रह २२ डिसेंबर २०३२ रोजी पृथ्वीवर आदळू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. याची शक्यता १.२ टक्के इतकीच असल्याचा अंदाजही या संस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ९९ टक्के अगदी सहज पृथ्वीच्या बाजूने निघून जाणार आहे. याबाबतचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.
हा लघूग्रहाची लांबी - रुंदी १३१ फूट बाय ३२८ फूट (४० बाय १०० मिटर) इतकी आहे. एखाद्या मध्यम आकाराच्या इमारतीएवढा हा लघुग्रह असू शकतो असे पृथ्वीजवळील ऑब्जेक्टचे अभ्यासक पॉल चॅडोस यांनी म्हटले आहे. अनेक टेलिस्कोपच्या माध्यमातून या लघूग्रहावर नजर ठेवली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जर कदाचित हा लघूग्रह पृथ्वीवर आदळलाच तर याचा परिणाम ५० किलोमिटर परिघात याने विनाश होईल. याचा वेग जवळपास १७ किलोमिटर प्रतिसेंकद असू शकतो म्हणजे ताशी ३८,०२८ किमी. इतक्या वेगाने तो पृथ्वीवर आदळू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
सध्या हा लघुग्रह अंतराळात २८ मिलियन मैल म्हणजे सुमारे ४५ मिलीयन किलोमीटर ( ४.५ कोटी किलोमिटर ) लांब आहे. तो पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत आहे. त्याला पृथ्वीपर्यंत पोहचण्यासाठी अंदाजे आठ वर्षे लागतील, अशी माहिती जेट प्रोपल्शन लॅबोरोटरी कॅलिफोर्निया येथील नॅव्हिगेशनचे इंजनिअर डेव्हिड फ्रान्सोशिया यांनी दिली.
२७ डिसेंबर रोजी चिली रिओ हट्रोडो याठिकाणी बसवलेल्या ‘ॲटलास’ या टेलिस्कोपने हा लघूग्रह पहिल्यांदा शोधला. ही दुर्बिण नासाच्या सहकार्याने बसवलेली आहे. आता यानंतर या न्यू मेस्किको येथील मॅग्डेलेनिया रिज ऑब्जरवेट्री व चिली येथील डॅनिश टेलिस्कोप यांच्या माध्यमातून या लघूग्रहावर नजर ठेवली जाणार आहे.