नव्या नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी…चीनचे होणार तुकडे!

नव्या नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी…चीनचे होणार तुकडे!
Published on
Updated on

लंडन : सोळाव्या शतकातील फे्ंरच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस याने वर्तवलेल्या भविष्यांची चर्चा नेहमी होत असते. लोक आजही त्याच्या गूढ भाषेत लिहिलेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. आता 'न्यू नॉस्ट्रॅडेमस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्रेग हॅमिल्टन पार्करने एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. क्रेगच्या अंदाजानुसार, 2023 या वर्षात जगाला तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जावे लागणार आहे. एका विमान अपघाताचे निमित्त होईल आणि तिसरे महायुद्ध सुरू होईल असे तो म्हणतो. या युद्धात चीनचे अनेक तुकडे होतील असेही त्याने म्हटले आहे. क्रेग हॅमिल्टन याने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यानंतरच क्रेगला 'नवीन नॉस्ट्रॅडेमस' म्हटले जाऊ लागले.

क्रेग हॅमिल्टन भविष्यातील तिसर्‍या महायुद्धासाठी रशिया आणि युक्रेनला दोष देत नाही तर चीन-तैवानला जबाबदार धरतो. तैवानमध्ये एका विमान अपघाताची घटना घडेल आणि त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाची सुरुवात होईल असा अंदाज त्याने वर्तवला आहे. दोन पाणबुड्यांची किंवा दोन विमानांची टक्कर होईल आणि जगासमोर हे संकट उभे ठाकेल असे तो म्हणतो. या घटनेमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल, असे त्याने म्हटले आहे. चीन-तैवानचा संघर्ष यावर्षी अधिक गंभीर रूप धारण करणार असल्याचे क्रेग हॅमिल्टन म्हणतोय.

एकतर पाणबुड्या एकमेकांवर आदळतील किंवा विमाने आदळतील, असे क्रेगने सांगितले. हा अपघात असेल किंवा कदाचित कोणीतरी ते घडवून आणेल. त्यानंतर सुरू झालेला संघर्ष हा काही वेळातच भीषण रूप धारण करेल. तैवान आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणवतो, तर चीनने तो आपलाच भाग असल्याचा दावा केलाय. चीनने तैवानवर दावा केला असला तरी अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. चीन आणि तैवानवरून सुरू झालेलं हे युद्ध एवढं मोठं होईल की त्यासमोर रशिया-युक्रेन युद्ध कुठेच नसेल.

क्रेग हॅमिल्टन म्हणतोय की, या युद्धात रशिया चीनची बाजू घेईल, ज्यामुळे गोष्टी आणखी धोकादायक होतील. प्रकरणे बिघडतील, ही माझी मुख्य चिंता आहे. या युद्धामध्ये चीनचे न भरून येणारे नुकसान होईल, त्याला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागेल. चीनचे अनेक तुकडे होतील, सध्याच्या मोठ्या चीनचे रूपांतर अनेक लहान देशांमध्ये होईल असा अंदाज क्रेग हॅमिल्टन याने व्यक्त केला आहे. फ्रान्सचा जगप्रसिद्ध भविष्यवेता नॅस्ट्रोडॅमसने 2023 साली मोठे युद्ध होणार असल्याचे त्याच्या भविष्यवाणीत सांगितले आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 1555 मध्ये त्याच्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, सात महिन्यांचे मोठे युद्ध होणार आणि त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news