No Kings Protest Against Trump : ट्रम्‍प यांच्‍याविरोधात अमेरिकेत 'नो किंग्ज'चा आक्रोश

देशातील २,७०० शहरांमध्‍ये सुमारे ७० लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला आंदोलनात सहभाग
'No Kings' Rally Against Trump
अमेरिकेत पुन्‍हा एकदा ट्रम्‍प प्रशासनाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी 'नो किंग्ज' (No Kings) आंदोलनात सुमारे सत्तर लाख आंदोलकांनी सहभाग घेतला. Image X
Published on
Updated on

'No Kings' Rally Against Trump in US

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्‍हा एकदा ट्रम्‍प प्रशासनाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी 'नो किंग्ज' (No Kings) आंदोलनात सुमारे सत्तर लाख आंदोलकांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती आयोजकांच्या हवाल्याने अमेरिकेतील वृत्तसंस्‍था 'CNN'ने दिली आहे. देशातील २,७०० हून अधिक शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन आणि धोरणांवर तीव्र विरोध दर्शविला.

तब्‍बल २० लाखांनी आंदोलकांची संख्‍या वाढली

जून २०२५ मध्‍ये अमेरिकेत ट्रम्‍प प्रशासनाविरोधात नागरिकांनी 'नो किंग्ज' आंदोलन केले. पहिल्या टप्प्यातील या आंदोलनास लक्षणीय प्रतिसाद मिळाला होता. आता मात्र या आंदोलनास नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असून तब्बल २० लाखांहून अधिक आंदोलकांची भर पडली आहे. देशभरात झालेल्‍या हे आंदोलन अत्‍यंत शांततापूर्णरित्‍या पार पडले. कोणतीही अनुचित घटना किंवा अटकेची नोंद झाली नसल्‍याचे पोलीस प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

'No Kings' Rally Against Trump
Los Angeles protests : ट्रम्‍प यांच्‍या स्‍थलांतरित धोरणाविरुद्ध लॉस एंजेलिसमध्‍ये 'आगडोंब'

ठिकठिकाणी निदर्शने आणि घोषणा

ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणांविरोधात शिकागो शहरातील आंदोलनात नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. त्‍यांनी स्वतः तयार केलेले फलक आणि "हँड्स ऑफ शिकागो" पोस्टर्स घेऊन रॅलीत सहभाग नोंदवला. आंदोलकांनी अमेरिकेचे ध्वज उलटे फडकवले होते, तसेच काही ठिकाणी मेक्सिकन आणि प्राइडध्वजही दिसले.लॉस एंजेलिसमध्येही असेच चित्र होते. राष्ट्रीय राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये, सध्याचे आणि माजी केंद्रीय कर्मचारी शासकीय कामकाज बंद होण्याच्या १८ व्या दिवशी पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू येथे जमले. त्यांनी शांततेमध्‍ये आपला निषेध नोंदवला. न्यू यॉर्क शहरातील पाचही क्षेत्रांमध्ये एक लाख लोकांची प्रचंड गर्दी असूनही दिवसभर आंदोलन शांततापूर्ण पार पडले.

'No Kings' Rally Against Trump
Donald Trump : नोबेल पुरस्‍काराबाबत ट्रम्‍प यांचे मोठे विधान; म्‍हणाले, "मी काही केले तरी..."

व्हाईट हाऊसने चोळले आंदोलकांच्‍या जखमेवर मीठ

एकीकडे देशभरात ट्रम्‍प प्रशासनाविरोधात नो किंग्‍ज आंदोलन पेटले असतानाच व्‍हाईट हाऊसने हा विरोध धुडकावल्‍याचे दिसले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प 'सम्राटाचा मुकुट' परिधान केलेले फोटोचा स्क्रीनशॉट रविवारी 'एक्स' (X) समाजमाध्यमावर व्हाईट हाऊसने शेअर केला. दरम्‍यान, डेमोक्रॅटिक नेत्यांनी या आंदोलनांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे, तर सत्ताधारी अनेक रिपब्लिकन खासदारांनी यावर "अमेरिका-विरोधी" अशी टीका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news