

Los Angeles protests
अमेरिकेच्या लॉस इंजेलिसमध्ये अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम राबवत ४४ विदेशी नागरिकांना अटक केली आहे. यानंतर स्थलांतरित धोरणाविरुद्ध सलग दुसर्यादिवशी शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शहरात दाेन हजार राष्ट्रीय रक्षक तैनात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.ट्रम्प यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की ' कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि लॉस एंजेलिसचे महापौर करेन बास त्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे. ते यासाठी सक्षम नसतील तर संघीय सरकारला हस्तक्षेप करून ही समस्या सोडवावी लागेल. दंगलखोरांना कठोर कारवाईलासामोरे जावे लागेल. समस्येनुसार उपाय शोधले जातील.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी कॅलिफोर्निया राष्ट्रीय रक्षकाचा ताबा घेण्याच्या आणि लॉस एंजेलिसमध्ये २००० सैन्य तैनात करण्याच्या फेडरल सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. ट्रम्प सरकारचा हा निर्णय तणाव आणखी भडकविणारा आहे. कॅलिफोर्निया शहर नॅशनल गार्ड ताब्यात घेण्याचा आणि २००० सैनिक तैनात करण्याचा निर्णय संघीय सरकार घेत आहे. हे पाऊल हेतुपुरस्सर प्रक्षोभक आहे आणि त्यामुळे तणाव वाढेल. लॉस एंजेलिसचे अधिकारी कायदा अंमलबजावणी मदत मिळवू शकतात. आम्ही शहर आणि काउंटीशी जवळून समन्वय साधत आहोत," असे त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी लॉस एंजेलिसमधील इमिग्रेशन विभागाने बेकायदेशीर स्थलांतरित असल्याच्या संशयावरून फॅशन परिसरात ४४ जणांना अटक केली. या विरोधातही लोकांनी निदर्शने केली होती. सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांशी भिडले. शनिवारीही पॅरामाउंट शहरातील लोक इमिग्रेशन विभागाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी उसळलेल्या दंगलीत काही वाहने जाळण्यात आली. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेकही केली.
ट्रम्प प्रशासन बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर उपाययोजना करत आहे आणि मोठ्या संख्येने बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यात आले आहे आणि त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या अंतर्गत, फेडरल इमिग्रेशन ऑथॉरिटी देशभरात विविध ठिकाणी छापे टाकत आहे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करत आहे. विभाग प्रमुखांनी सांगितले की त्यांची एजन्सी दररोज सुमारे १६०० बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करत आहे.