Nirav Modi Bail Rejected | कर्जबुडव्या नीरव मोदीचा लंडन हायकोर्टाने दहाव्यांदा जामीन अर्ज फेटाळला

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील निरव मोदीला कोर्टाकडून पुन्हा झटका मिळाला आहे. CBI आणि ED च्या जोरदार युक्तिवादामुळे UK कोर्टाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला.
Nirav Modi Bail Rejected
Nirav Modi Bail Rejectedfile photo
Published on
Updated on

Nirav Modi Bail Rejected

दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी ला लंडन न्यायालयाने झटका दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी दाखल केलेली नवीन जामीन याचिका गुरुवारी लंडनच्या किंग्ज बेंच डिव्हिजनच्या उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयात सीबीआयच्या जोरदार युक्तिवादामुळे कोर्टाने जामीन नाकारला. यूकेमध्ये अटकेनंतरची त्याची ही दहावी जामीन याचिका आहे.

Nirav Modi Bail Rejected
Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? 'ॲपल'ला दिला 'हा' अनाहूत सल्‍ला

न्यायालयात सुनावणीदरम्यान, क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) च्या वकिलाने जामिनाला जोरदार विरोध केला. मात्र सीबीआय टीमने क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) सोबत संपूर्ण प्रकरणात भारत सरकारची बाजू जोरदारपणे मांडली. यासाठी सीबीआय तपास पथक लंडनला पोहोचले होते. नीरव मोदीला जामीन देणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते हे सिद्ध करण्यासाठी सीबीआयने जोरदार युक्तिवाद सादर केले. न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद मान्य केले आणि नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला.

२०१९ पासून लंडनच्या तुरुंगात

नीरव मोदी १९ मार्च २०१९ पासून लंडनच्या तुरुंगात आहे. सुमारे ६४९८.२० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील तो मुख्य आरोपी आहे. भारताने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले असून सीबीआयला त्याला भारतात आणायचे आहे. यूके उच्च न्यायालयाने भारत सरकारच्या बाजूने त्याच्या प्रत्यार्पणाला आधीच मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news