Nepal Floods Death Toll : नेपाळ महापूरातील मृतांचा आकडा १,००३ वर; तब्बल ४,००० नागरिक अजूनही बेपत्ता

उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावांमध्ये मोठे नुकसान
Nepal Floods Death Toll
Nepal Floods Death Toll
Published on
Updated on

Nepal Floods Death Toll : नेपाळमधील आठ जिल्ह्यांतून आणखी मृतदेह हाती आल्यानंतर भीषण महापुरातील मृतांची संख्या आज (दि. १) १,००३ वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, अद्याप सुमारे ४,००० नागरिक बेपत्ता असून १२,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावांमध्ये मोठे नुकसान

गेल्या २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे अचानक पूर आला. यामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हिमालयातील सीमावर्ती भागातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढल्याने घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले.

Nepal Floods Death Toll
Nepal Flood : 'महापूर आलाय, पळा...!'; एका अज्ञात व्यक्तीच्या हाकेने वाचवला ३७० विद्यार्थी अन् शिक्षकांचा जीव!

विविध जिल्ह्यांतील मृतांची संख्या

प्राधिकरणाने दिलेली मृतांची आकडेवारी : चितवन : ३२१, नवलपरासी ईस्ट : २१६,नवलपरासी वेस्ट : १७०, नुवाकोट : ९५, गोरखा : ६५, धाडिंग : ५७, रसुवा : ४१, तनहुन : ३८. दरम्‍यान, चिनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, या आपत्तीत चीनच्या हद्दीत १६ जणांचा मृत्यू झाला असून तिबेटमध्ये सुमारे ५५० जण अद्याप बेपत्ता आहेत.

अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा

नेपाळ प्रशासनाने मंगळवारी देशातील पूर्व, मध्य आणि पश्चिम भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा नवीन इशारा जारी केला आहे. नुवाकोट आणि रसुवा जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका सर्वाधिक आहे.ताप्लेजुंग, संखुवासभा, सोलुखुम्बु, काठमांडू, ललितपूर, भक्तपूर यांसारख्या पूर्व आणि मध्य नेपाळमधील अनेक जिल्ह्यांत नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गोरखा, डोल्पा, कैलाली या पश्चिम नेपाळमधील जिल्ह्यांसाठीही अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोशी, नारायणी, बागमती, कर्णाली आणि महाकाली या प्रमुख नद्यांच्या जलपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Nepal Floods Death Toll
Nepal Flood Death Toll : नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ७८८ वर

२१ हजार जवान तैनात

शोध व बचावकार्यासाठी २१,००० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवली जात आहे.वाहतुकीस योग्य असलेले १९ पूल आणि प्रमुख महामार्ग पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. चीनसोबतचा मुख्य व्यापारी मार्ग आणि रसुवागढी सीमा मार्ग पूर्णपणे प्रभावित झाला आहे. काठमांडूला जोडणाऱ्या पृथ्वी आणि त्रिभुवन महामार्गांवर एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. १४ आसनांपर्यंतच्या लहान वाहनांना फारपिंग-कुलेखानी मार्गाने, तर मोठ्या मालवाहू वाहनांना त्रिभुवन आणि कांती महामार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news