Mossad operative Killed: इराणला उद्ध्वस्त करणाऱ्या मोसादच्या 'त्या' मास्टरमाईंड गुप्तहेराचाच खात्मा!

Mossad operative Killed:
Mossad operative Killed:pudhari
Published on
Updated on

Mossad operative Killed: इस्त्रायलने इराणविरूद्ध ऑपरेशन रोअरिंग लायन सुरू केलं. या ऑपरेशन अंतर्गत इराणमधील वरिष्ठ नेतृत्वाचा खात्मा करण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा देखील यात मृत्यू झाला होता. आता या ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मोसादच्या गुप्तहेराचा इस्त्रायलबाहेर मृत्यू झाला असल्याची माहिती मोसादचे संचालक डेव्हिड बारनेआ यांनी दिली. त्यांनी तो व्यक्ती कोण होता याची माहिती दिली नसली तरी त्यांनी उघड केलेलं नसलं तरी त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे त्याची ओळख 'एम' अशी सांगितली आहे.

Mossad operative Killed:
Parbhani Crime : परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टचे लॉक फोडून सीसीटीव्हीची तोडफोड, कर्मचाऱ्यावर हल्ला

कर्तव्य बजावताना शहीद

मोसादच्या ऑपरेटिव्हला श्रद्धांजली देण्याच्या कार्यक्रमावेळी बारनेया यांनी सांगितलं की 'जे मिशन मिस्टर एम यांनी लीड केलं होतं. त्याचा मोठा प्रभाव इराणविरूद्धच्या संयुक्त कारवाईवेळी पडला होता. ऑपरेशन रोअरिंग लायनवेळी गुप्तहेर एम ने दाखवलेल्या कॅरेक्टर आणि केलेल्या कारवाईने माझे ऊर अभिमानानं भरून आलं आहे. हा गुप्तहेर एम देशाबाहेर आपले कर्तव्य बजावताना शहीद झाला आहे.'

Mossad operative Killed:
Iran US Israel peace talks debate | निर्णायक बदलाची नांदी

बारनेया यांनी ऑपरेशन रोअरिंग लायन्सवेळी या गुप्तहेराने ज्या प्रकारे कल्पकतेनं, कलात्मक आणि तंत्रज्ञानाचा वापर उत्तमरित्या केला. त्याचा मोठा प्रभाव ऑपरेशन रोअरिंग लायन्सवेळी पडला आहे. असे देखील वक्तव्य केलं.

Mossad operative Killed:
Donald Trump Iran Ceasefire: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा: इराणसोबतचा युद्धविराम वाढवला; पाहा काय आहेत अटी!

काय आहे ऑपरेशन रोअरिंग लायन?

ऑपरेशन रोअरिंग लायन हे इस्त्रायल आणि अमेरिका यांनी इराणविरूद्ध संयुक्तरित्या राबवलेले ऑपरेशन होते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे ऑपरेशन लाँच करण्यात आलं. त्यात इराणमधील सर्वोच्च नेतृत्वाचा खात्मा करण्यात आला. इस्त्रायलने या ऑपरेशनला रोअरिंग लायन हे कोडनेम दिलं होतं. तर अमेरिकेने याच ऑपरेशनला एपिक फ्युरी असं कोडनेम दिलं होतं. हे ऑपरेशन इराणच्या न्युक्लिअर प्रोग्रामवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news