Mojtaba Khamenei : 'तुमचा खरा शत्रू ओळखा': मुस्लिम देशांना इराणचे सर्वोच्‍च नेते मोज्तबा खामेनींचे आवाहन

अमेरिका अन् इस्रायलविरोधात आखातीमधील देशांना एकजुटीची हाक

Mojtaba Khamenei Message Muslim Countries
Mojtaba Khamenei Message Muslim Countries File Photo
Published on
Updated on

Mojtaba Khamenei Message Muslim Countries

मध्य पूर्व आशियातील युद्ध पेटून सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी आज (दि. ३०) प्रादेशिक मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व मुस्लिम राष्ट्रांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधात एकजूट दाखवून आपल्या 'खऱ्या शत्रूला' ओळखावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी एका लेखी पत्राद्वारे दिला आहे.

शिया मुस्लिम समुदायातर्फे संदेश जारी

२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोज्तबा यांच्याकडे देशाची सूत्रे आली. मात्र, नियुक्तीनंतर ते अजूनही सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत, तसेच प्रशासनाकडून त्यांचा कोणताही व्हिडिओ किंवा ऑडिओ संदेश जारी करण्यात आलेला नाही. शिया मुस्लिम समुदायातर्फे साजरी केल्या जाणाऱ्या प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी हा संदेश दिला. "इस्लामिक राष्ट्रांच्या समस्यांवर एकमेकांमधील ऐक्य, मैत्री आणि सहकार्य हाच एकमेव मार्ग आहे," असे त्यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Mojtaba Khamenei Message Muslim Countries
Iran Sanctions | इराणसोबत आर्थिक संबंध ठेवणाऱ्यांवर कठोर निर्बंध

सर्व देशांनी आपल्या खऱ्या शत्रूला ओळखावे

आपल्या संदेशात त्यांनी प्रादेशिक देशांच्या प्रमुखांना इशारा देताना सांगितले की, "मुस्लिम समाजात फूट पाडणारे किंवा संघर्ष निर्माण करणारे कोणतेही कृत्य कळत-नकळतपणे करणाऱ्या व्यक्तीने शेवटी इस्लामाच्या शत्रूंचीच सेवा केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी आपल्या खऱ्या शत्रूला ओळखून, त्याचा कट समजून घेतला पाहिजे आणि त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे." असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.


Mojtaba Khamenei Message Muslim Countries
Iran threat Trump : 'ट्रम्प यांच्या मुलाला कुठे मारायचे... ९६ कोटींचे बक्षीस'; इराणच्या सरकारी टीव्हीवरील व्हिडिओमुळे खळबळ

आखाती देशांचे इराणबरोबरील संबंध ताणलेले

युद्धकाळात इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), जॉर्डन, कुवैत, कतार आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांनंतर इराणचे या देशांशी असलेले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.


Mojtaba Khamenei Message Muslim Countries
Iran US Tensions | अमेरिकन सैनिकांच्या हत्या करणाऱ्यास ३०,००० डॉलर्सचे बक्षीस जाहीर

अंतर्गत मतभेद बाजूला ठेवण्याचे इराणी नागरिकांना आवाहन

इराणच्या धोरणांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असणाऱ्या खामेनी यांनी देशातील नागरिक आणि अधिकाऱ्यांनाही आपापसातील मतभेद मिटवण्याचे आवाहन केले आहे. "इराणी जनतेला माझा हाच सल्ला आहे की, त्यांनी आपल्यात कोणत्याही प्रकारे दुही निर्माण होऊ देऊ नये. सामाजिक ऐक्याला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई आहे," असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. याशिवाय, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने घातलेली सागरी नाकेबंदी आणि जुने आर्थिक निर्बंध यामुळे सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर मात करण्यासाठी इराणच्या अर्थव्यवस्थेतील 'डॉलरायझेशन' (अमेरिकन चलनावर असणारे अवलंबित्व) टप्प्याटप्प्याने कमी करावे आणि स्थानिक उत्पादनाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news