Microsoft: मायक्रोसॉफ्टची सेवा ५ तास ठप्प! जगभरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) प्रमुख सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाल्याने हजारो युजर्सना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
Microsoft
MicrosoftFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: गुरुवारी जागतिक स्तरावर मायक्रोसॉफ्टच्या प्रमुख सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाल्याने हजारो युजर्सना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मायक्रोसॉफ्ट ३६५, आउटलुक, टीम्स आणि इतर महत्त्वाच्या ॲप्सची सेवा सलग पाच तासांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. या तांत्रिक बिघाडाचा केवळ मायक्रोसॉफ्टच्या युजर्सनाच नव्हे, तर ओपनएआय आणि एन्थ्रोपिक या अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांच्या सेवांनाही फटका बसला आहे.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेचार वाजेपर्यंत प्रभावित सर्व्हर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. या काळात काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली असून युजर्स हळूहळू पुन्हा कनेक्ट होत आहेत.

Microsoft
Electric vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! देशांतर्गत उद्योगांना सोन्याचे दिवस येणार

डाउनडिटेक्टरवर तक्रारींचा महापूर

वेबसाईटच्या आउटेजेसवर लक्ष ठेवणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' (Downdetector) या प्लॅटफॉर्मनुसार, आउटलुक संबंधीच्या तक्रारींनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११:३० वाजता तब्बल १,३८,०५८ चा उच्चांक गाठला होता. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या घटकर ३४,४९० वर आली.

अचानक भार वाढल्याने बिघाड

कंपनीच्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅफिकमध्ये कोणतीही वाढ झाली नसली, तरी अचानक वाढलेल्या लोडमुळे अनेक सर्व्हर अनपेक्षितपणे डाऊन झाले होते. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवा, विशेषतः एक्सचेंज ऑनलाइनमध्ये युजर्सना भेडसावणाऱ्या समस्येची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून चौकशी सुरू आहे."

सध्या प्रभावित सर्व्हर पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून, जिथे शक्य आहे तिथे ट्रॅफिक आणि कनेक्शन्स वैकल्पिक मार्गांवर (Alternative Routes) वळवण्यात आले आहेत. यामुळे परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. सर्व्हर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर युजर्सचे क्लायंट्स पुन्हा ऑटो-कनेक्ट होऊन सेवा सुरळीत होईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एआय कंपन्यांच्या कामकाजात अडथळे

या जागतिक आउटेजचा परिणाम कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही जाणवला. मायक्रोसॉफ्ट कनेक्टर्समधील समस्येमुळे नवीन कनेक्शन्स खंडित होणे आणि टूल्स अपेक्षेप्रमाणे काम न करणे अशा अडचणींना 'ओपनएआय'ला सामोरे जावे लागले. तसेच, अपस्ट्रीम सर्व्हरवरील समस्येमुळे 'एंथ्रोपिक'च्या मायक्रोसॉफ्ट ३६५ कनेक्टरवरही विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

Microsoft
Anirudh Ravichander-Kavya Maran: कोण आहे अनिरुद्ध रविचंदर? ज्याच्याशी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बांधली लग्नगाठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.