Russia Ukraine ceasefire: रशिया-युक्रेन युद्धात मेलानिया ट्रम्प यांची मध्यस्थी; ओलेशकीमध्ये दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू

युक्रेनमधील ओलेशकी शहरात आणि लगतच्या परिसरात ठरलेल्या वेळेच्या तब्बल दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू झाली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.
Russia Ukraine ceasefire: रशिया-युक्रेन युद्धात मेलानिया ट्रम्प यांची मध्यस्थी; ओलेशकीमध्ये दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू
Published on: 
Updated on: 

Russia Ukraine ceasefire

वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. युक्रेनमधील ओलेशकी शहरात आणि लगतच्या परिसरात ठरलेल्या वेळेच्या तब्बल दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू झाली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी मंगळवारी सोशल मीडियाद्वारे ही महत्त्वाची घोषणा केली. नागरिकांचे रक्षण करणे आणि युद्धग्रस्त भागात तातडीची मानवतावादी मदत पोहोचवणे हा या युद्धबंदीचा मुख्य उद्देश आहे.

मेलानिया ट्रम्प यांनी 'एक्स'वर माहिती देताना सांगितले की, "रशिया आणि युक्रेनमधील ही युद्धबंदी मॉस्कोच्या वेळेनुसार २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून अंमलात आली आहे. युद्धग्रस्त भागातील नागरिकांची सुरक्षा आणि मदत सामग्री वेगाने पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया दोन दिवस आधीच सुरू करण्यात आली. तसेच मदत पथकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून या युद्धबंदीची भौगोलिक व्याप्ती खेरसॉन प्रदेशातील ओलेशकी शहराच्या पलीकडे वाढवण्यात आली आहे."

Russia Ukraine ceasefire: रशिया-युक्रेन युद्धात मेलानिया ट्रम्प यांची मध्यस्थी; ओलेशकीमध्ये दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू
Donald Trump : फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब का उसळला? अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली धक्कादायक कारणे

अतिशय बिकट परिस्थिती

यापूर्वी २३ ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात, मेलानिया ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे ओलेशकी भागात लष्करी कारवाई तात्पुरती थांबवण्यावर दोन्ही देशांचे ऐक्य झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे आणि मदत साहित्य पोहोचवणे शक्य झाले आहे.

ओलेशकी शहर महाविनाशाच्या उंबरठ्यावर

ओलेशकी शहरात सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे शहर महाविनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. शहरात आता प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिक शिल्लक राहिले असून त्यांना वैद्यकीय उपचार, औषधे, अन्न आणि पिण्याच्या पाण्याची तातडीने गरज आहे. वीजपुरवठा खंडित असणे, रस्त्यांवर पेरलेली भूसुरुंगे आणि सतत होणारे हल्ले यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.

व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, या युद्धबंदीची वेळ, तांत्रिक बाबी आणि इतर व्यवस्था अंतिम करण्यासाठी मेलानिया ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिनिधींनी रशिया व युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. दोन्ही देशांचे नागरिक प्रतिनिधी घरोघरी जाऊन रहिवाशांच्या गरजांचा आढावा घेतील. तसेच, ज्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायचे आहे, त्यांना रशिया किंवा युक्रेनमधील त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि सहकार्य पुरवले जाईल. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि नागरिकांच्या इच्छेचा आदर व्हावा यासाठी अमेरिकेतील एका निष्पक्ष माध्यम संस्थेचे पथक या संपूर्ण मोहिमेचे चित्रीकरण करणार आहे.

२४,००० लोकसंख्येतील केवळ १,७०० जण उरले

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८१ व्या अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'फॉस्टरिंग द फ्युचर टुगेदर' या विशेष कार्यक्रमात ओलेशकी येथील गंभीर परिस्थितीकडे मेलानिया ट्रम्प यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ही मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली. दक्षिण युक्रेनमधील नीपर नदीकाठी असलेल्या ओलेशकी शहराची युद्धपूर्व लोकसंख्या सुमारे २४,००० इतकी होती. मात्र, सद्यस्थितीत तिथे केवळ १,७०० ते २,००० नागरिक उरले असून, त्यात बहुतांश वृद्ध नागरिक आणि सुमारे ५० मुलांचा समावेश आहे.

Russia Ukraine ceasefire: रशिया-युक्रेन युद्धात मेलानिया ट्रम्प यांची मध्यस्थी; ओलेशकीमध्ये दोन दिवस आधीच युद्धबंदी लागू
Donald Trump | अमेरिका निवडणुकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ केंद्रस्थानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news