इस्रायलवर हिजबुल्लाहचा मोठा हल्ला! 165 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

Hezbollah Attack on Israel : आयर्न डोम हल्ला रोखण्यात अपयशी
israel vs hezbollah war
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel vs Hezbollah War : इस्रायल सध्या हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवाद्यांविरुद्ध दोन आघाड्यांवर थेट युद्ध करत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री लेबनीज दहशतवाद्यांनी इस्रायलच्या उत्तरेकडील शहरांवर 165 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला इतका भीषण होता की इस्त्रायलच्या शिन बेट आणि आयर्न डोम या हवाई संरक्षण यंत्रणाही अनेक क्षेपणास्त्रांना रोखण्यात अयशस्वी ठरल्या.

हिजबुल्लाहने हैफा शहरावर 90 हून अधिक तर गॅलीलमध्ये सुमारे 50 मिसाईल डागली. आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की या हल्ल्यात एका लहान मुलासह किमान सात जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर रस्त्यावरील अनेक वाहनांना आग लागली आणि निवासी भागातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

एक दिवस आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचवेळी, आता लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या सैनिकांनी बदला घेण्यासाठी इस्रायलवर मोठा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

लेबनीज हवाई हल्ल्यानंतर, इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रॉकेट हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. IDF ने म्हटले आहे की, ‘उत्तर इस्रायलवर हल्ला झाला आहे. आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू.’

IDF ने सांगितले की अंदाजे 50 हून अधिक मिसाईल गॅलीली शहरावर डागण्यात आली. तर अनेक मिसाईल कार्मेल क्षेत्र आणि आसपासच्या शहरांवर देखील पडले. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना, हिजबुल्लाहने सांगितले की त्यांनी कार्मेल सेटलमेंटमधील पॅराट्रूपर ब्रिगेड प्रशिक्षण तळाला लक्ष्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news