Trump to Tech Companies | भारतीयांना नोकऱ्या, चीनमध्ये फॅक्टऱ्या; आता चालणार नाही! ट्रम्प यांचा अमेरिकेतील टेक कंपन्यांना इशारा

Trump to Tech Companies | 'अमेरिका फर्स्ट' धोरण नसल्यास टेक जायंट कंपन्यांना परिणाम भोगावा लागेल...
donald trump
donald trump Pudhari
Published on
Updated on

Donald Trump to Tech giant companies hiring indians and factories in China

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 'अमेरिका फर्स्ट'चा नारा देत देशातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना (Tech Giants) खडे बोल सुनावले आहेत. चीनमध्ये कारखाने उभारणे आणि भारतीयांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देणे यावरून ट्रम्प यांनी या कंपन्यांवर जोरदार टीका केली.

"ते दिवस आता संपले आहेत," असा थेट इशाराही त्यांनी दिला. वॉशिंग्टनमध्ये आयोजित एका महत्त्वाच्या 'एआय समिट' (AI Summit) दरम्यान ते बोलत होते.

एआय समिटमध्ये ट्रम्प आक्रमक

वॉशिंग्टन येथे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (Artificial Intelligence) परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांच्या जागतिक धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी एआय संबंधित तीन महत्त्वपूर्ण कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली.

ट्रम्प म्हणाले, "खूप काळापासून आपल्या तंत्रज्ञान उद्योगाने एका अशा जागतिकवादाचा पुरस्कार केला, ज्यामुळे लाखो अमेरिकन नागरिकांमध्ये अविश्वास आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली.

आपल्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला, पण त्याच वेळी त्यांनी आपले कारखाने चीनमध्ये उभारले, भारतात कर्मचारी नियुक्त केले आणि आयर्लंडमध्ये नफा लपवला.

हे तुम्हालाही माहीत आहे. आणि हे सर्व करताना त्यांनी आपल्याच देशातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचे मत दडपण्याचा प्रयत्न केला."

donald trump
Russian plane crash | रशियात 49 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले; सर्व प्रवाशांच्या मृत्यूची भीती...

पूर्णतः अमेरिकेसाठी काम करा...

आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी ठामपणे सांगितले, "पण अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, ते दिवस आता संपले आहेत."

या कंपन्यांना आवाहन करताना ते पुढे म्हणाले, "तुम्ही तंत्रज्ञान कंपन्यांनी पूर्णपणे अमेरिकेसाठी काम करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण स्वीकारायला सांगत आहोत. तुम्ही ते केलेच पाहिजे. आमची फक्त एवढीच मागणी आहे."

एआय धोरणासाठी कार्यकारी आदेश

या कार्यक्रमात ट्रम्प यांनी एआय संबंधित अनेक धोरणात्मक निर्णय जाहीर केले. त्यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांनुसार, आता केंद्र सरकारकडून वापरल्या जाणाऱ्या एआय मॉडेल्समध्ये सत्यता आणि वैचारिक तटस्थतेला प्राधान्य दिले जाईल.

'एआय ॲक्शन प्लॅन'ची घोषणा: या योजनेत अमेरिकन एआयची निर्यात करणे, डेटा सेंटर्सची वेगाने उभारणी करणे, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे यांसारख्या प्रमुख धोरणांचा समावेश आहे.

पक्षपाती एआयला विरोध: व्हाइट हाऊसच्या निवेदनानुसार, विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता (Diversity, Equity, and Inclusion - DEI) यांसारख्या विचारसरणीमुळे एआयच्या अचूकतेशी तडजोड केली जात आहे. या पक्षपाती एआय आउटपुटपासून अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करणे हा ट्रम्प यांचा उद्देश आहे.

donald trump
NISAR Satellite | भारत-अमेरिकेच्या ₹ 13000 कोटींच्या महाकाय उपग्रहाचे 30 जुलैला प्रक्षेपण; 12 दिवसांत करणार पृथ्वीचे स्कॅनिंग...

एआयमध्ये जागतिक वर्चस्वाची शर्यत

अमेरिकेच्या 'एआय ॲक्शन प्लॅन'च्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, "कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (एआय) जागतिक वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिका एका शर्यतीत आहे. ज्याच्याकडे सर्वात मोठी एआय इकोसिस्टम असेल, तोच जागतिक एआय मानके निश्चित करेल आणि त्याला व्यापक आर्थिक व लष्करी फायदे मिळतील."

यावर जोर देताना ट्रम्प यांनी म्हटले, "ज्याप्रमाणे आपण अंतराळ शर्यत (Space Race) जिंकली, त्याचप्रमाणे अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी ही शर्यत जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news