Russian plane crash | रशियात 49 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले; सर्व प्रवाशांच्या मृत्यूची भीती...

Russian plane crash | अमूर प्रदेशात अपघात, प्रवाशांत 5 लहान मुलांचाचा समावेश, 6 क्रु सदस्य
plane
plane Pudhari
Published on
Updated on

Russian plane crash with 49 on board

मॉस्को : रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रदेशात गुरुवारी एक मोठी आणि भीषण विमान दुर्घटना घडली. सायबेरियास्थित 'अंगारा' एअरलाइन्सचे प्रवासी विमान कोसळले असून, यात 5 मुलांसह 43 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य असे एकूण 49 जण प्रवास करत होते. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचाव पथकाला विमानाचे जळणारे अवशेष सापडले असून, अपघातामागे खराब हवामान आणि वैमानिकाची चूक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लँडिंगपूर्वीच संपर्क तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, 'अंगारा' एअरलाइन्सच्या अँटोनोव्ह An-24 (Antonov An-24) या प्रवासी विमानाने उड्डाण केले होते. हे विमान चीनच्या सीमेला लागून असलेल्या अमूर प्रदेशातील ट्यिंडा (Tynda) शहराकडे जात होते.

विमान आपल्या निश्चित स्थळी पोहोचत असताना आणि लँडिंगची तयारी करत असतानाच अचानक रशियन हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा (Air Traffic Control) विमानाशी संपर्क तुटला.

काही क्षणांतच विमान रडारच्या स्क्रीनवरूनही गायब झाले, ज्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.

प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात सहा क्रू सदस्यांसह 43 प्रवासी होते, ज्यात पाच मुलांचा समावेश होता.

plane
Air India crash Wrong bodies sent | ब्रिटनला चुकीचे मृतदेह पाठवले! अहमदाबाद अपघातानंतर मोठी गडबड, DNA जुळत नाहीत...

बचाव पथकाला जळणारे अवशेष सापडले

रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी बचाव हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले होते. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाला विमानाचे अवशेष सापडले. या घटनेनंतर तातडीने शोध आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.

"रोसाव्हियात्सिया (रशियाचे नागरी विमान वाहतूक प्राधिकरण) द्वारे संचालित Mi-8 हेलिकॉप्टरला विमानाचे जळणारे अवशेष दिसले आहेत," अशी माहिती आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामवर दिली.

विमानाचे अवशेष दुर्गम भागात सापडले असून, ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते. या दृश्यांमुळे विमानातील कोणीही वाचले असण्याची शक्यता धूसर झाली आहे.

अपघातामागे 'क्रू एरर' ची शक्यता

रशियन वृत्तसंस्था 'Tass' ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातामागे प्राथमिकदृष्ट्या 'क्रू एरर' म्हणजेच वैमानिकाकडून झालेली चूक हे प्रमुख कारण मानले जात आहे. लँडिंगदरम्यान हवामान खराब होते आणि दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती.

अशा परिस्थितीत विमान उतरवताना वैमानिकाकडून चूक झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तथापि, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

plane
NISAR Satellite | भारत-अमेरिकेच्या ₹ 13000 कोटींच्या महाकाय उपग्रहाचे 30 जुलैला प्रक्षेपण; 12 दिवसांत करणार पृथ्वीचे स्कॅनिंग...

जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अँटोनोव्ह An-24: रशियातील एक जुने पण विश्वासू विमान अपघातग्रस्त झालेले अँटोनोव्ह An-24 हे विमान 1950 च्या दशकात विकसित केले गेले होते. हे जुने मॉडेल असले तरी, रशियामध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

आतापर्यंत या विमानाचे 1000 हून अधिक युनिट्स तयार करण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे या जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news