
Israel Iran Conflict Israel daily expenses of war
तेल अवीव : इराण आणि इस्रायल यांच्यात चालू असलेला संघर्ष आता केवळ दोन्ही देशांच्या सैन्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर हा संघर्ष आता आर्थिक संकटातही परिवर्तित झाला आहे.
इस्रायलचे माजी संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल रीम एमीनाक यांच्या माहितीनुसार, सध्या इस्रायल दररोज युद्धावर सुमारे 725 दशलक्ष डॉलर (6000 कोटी रुपये) खर्च करत आहे. या खर्चामध्ये प्रामुख्याने मिसाईल्स, जेट इंधन, बॉम्ब फेकणे आणि सैन्य तैनाती यांचा समावेश आहे.
इराण-इस्र्यायल संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. वाढता संरक्षण खर्च, गडगडणारा जीडीपी आणि वाढती बजेट तुट यामुळे इस्र्यायलच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त दबाव येत आहे. या संघर्षाचे परिणाम जागतिक बाजारपेठांवर आणि ऊर्जा क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत.
13 जून रोजी इराणवर इस्रायलने केलेल्या प्रतिआक्रमणानंतर फक्त पहिल्या दोन दिवसांतच 1.45 अब्ज डॉलर (12,500 कोटी रुपये) खर्च झाले. यापैकी 5000 कोटी रुपये बॉम्ब आणि इंधनावर, तर उर्वरित रक्कम इतर संरक्षण खर्चावर झाली आहे.
या युद्धामुळे 2025 साठी इस्रायलच्या GDP वाढीचा दर 4.3 टक्क्यांवरून 3.6 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. तसेच, आधीच 4.9 टक्क्यांइतकी जीडीपीच्या टक्केवारीत असलेली बजेट तूट आणखी वाढू शकते, असा अंदाज अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.
इस्रायलच्या संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2023 मध्ये जे बजेट 15 अब्ज डॉलर होते, ते आता 2025 मध्ये 31 अब्ज डॉलर होणार आहे. म्हणजेच जीडीपीच्या जवळपास 7 टक्क्यांपर्यंत ते जाते. या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या संघर्षात इराणने 400 पेक्षा अधिक मिसाईल्स डागल्या आहेत, तर इस्रायलने 120 लॉन्चर्स नष्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र, च्या इजराइलचे मिसाईल डिफेन्स सिस्टिम (जसे की आयरन डोम) आता थकले आहेत.
अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा वाढली असून, इस्रायलने नवीन डिफेन्स सिस्टिम आणि निधी मागितला आहे. सध्या इस्रायलला अमेरिका प्रत्येक वर्षी अंदाजे 30,000 कोटी रुपये संरक्षण मदत देतो, त्यापैकी 4500 कोटी रुपये आयरन डोम आणि एयरो सिस्टिमसाठी असतात. ही मदत ‘इस्रायल फंड’ म्हणून ओळखली जाते.
या युद्धाचा परिणाम जगभरात उमटताना दिसत आहेत. कच्च्या तेलाचे दर 5 टक्क्यांनी वाढले असून ब्रेंट क्रूड 74.60 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. तसेच, S&P 500 आणि आशियाई शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली आहे.
याशिवाय, जलमार्गांवरील धोक्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे.