ADR Election Report 2024 | लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक खर्च! जाहिराती, हेलिकॉप्टर, स्टार प्रचारकांच्या दौऱ्यासाठी 1494 कोटी...
ADR Election expesnes Report 2024 BJP ₹1494 Crore Spending Congress AAP Election Commission India Political Campaign Funding
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा आणि त्याचबरोबर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त खर्च भारतीय जनता पक्षाने (BJP) केला असून, एकूण 1494 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे एकूण निवडणूक खर्चाच्या 44.56 टक्के आहे. काँग्रेसने 620 कोटी रुपये खर्च केले. काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी एकूण खर्चाच्या 18.5 टक्के खर्च केला. आहे.
एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात एकूण 32 राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या खर्चाचा अभ्यास करण्यात आला.
महत्त्वाची आकडेवारी
एकूण निवडणूक खर्च (16 मार्च - 6 जून 2024): 3352.81 कोटी रुपये
राष्ट्रीय पक्षांचा खर्च: 2204 कोटी (65.75 टक्के) रुपये
प्रादेशिक पक्षांचा खर्च: उर्वरित हिस्सा
पक्षांनी मिळवलेला निधी (फंडिंग):
राष्ट्रीय पक्ष: 6930.25 कोटी रुपये (93.08 टक्के)
प्रादेशिक पक्ष: 515.32 कोटी रुपये
जास्तीत जास्त खर्च कोणत्या गोष्टींवर झाला?
1. प्रचारावर: एकूण ₹2008 कोटी (एकूण खर्चाचा 53 टक्के) टीव्ही, पोस्टर्स, डिजिटल माध्यमे, प्रचार सभा इत्यादी यासाठी हा खर्च झाला.
प्रचारकांच्या दौऱ्यावर एकूण 795 रुपये कोटी खर्च झाले.
त्यातील 765 कोटी रुपये स्टार प्रचारकांवर खर्च झाले.
केवळ 30 कोटी रुपये इतर कार्यकर्ते व प्रचारकांवर खर्च झाले.
2. डिजिटल/वर्चुअल प्रचार : 132 कोटी रुपये
3. उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड प्रसिद्ध करणे: 28 कोटी रुपये
4. मेदवारांना दिलेली रोख रक्कम: 402 कोटी रुपये
या पक्षांकडून अहवाल सादर करण्यास उशीर
नियमानुसार, निवडणूक खर्चाचा अहवाल 90 दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. मात्र,
आप (AAP): 168 दिवसांनी अहवाल सादर केला.
BJP: 139 ते 154 दिवस उशिर केला.
केवळ काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा दोन्ही खर्चाचे विवरण वेळेत सादर केले आहे.
इतर निरीक्षणे
NCP, CPI, JMM, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांसारख्या पक्षांचे अहवाल अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाहीत.
PDP व केरळ काँग्रेस (M) यांसारख्या पक्षांनी निवडणुका लढवूनही ‘शून्य खर्च’ दाखवला.
690 नोंदणी नसलेल्या (unrecognized) पक्षांनी निवडणुका लढवल्या, परंतु त्यांचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही.

