
Israel Iran Conflict Barak air defence system drone UAV interception Barak-8 missile system Iron Dome vs Barak Anti-drone missile system
तेल अवीव : इस्रायलच्या लष्कराने त्यांच्या अत्याधुनिक ‘बराक’ एअर डिफेन्स प्रणालीचा प्रथमच प्रत्यक्ष युद्धपरिस्थितीत वापर करत एक इराणी मानवरहित विमान (ड्रोन) यशस्वीरीत्या पाडले आहे. ही कारवाई इस्रायलच्या हवाई क्षेत्रात घडली असून, इस्रायली लष्कराने शुक्रवारी ही माहिती दिली.
ही प्रणाली म्हणजे ‘बराक-8’ मिसाईल प्रणाली. जी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) आणि इस्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) ने संयुक्तपणे विकसित केली आहे. यामध्ये भारताने महत्त्वाचे तंत्रज्ञान, विशेषतः ड्युअल-फेज रॉकेट मोटर विकसित केली आहे.
इस्रायल लष्कराने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हिब्रु भाषेत याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज (शुक्रवारी) सकाळी ‘बराक’ प्रणालीने इस्रायली हवाई क्षेत्रात घुसलेले एक मानवरहित विमान अडवले. ही प्रणाली इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित असून, देशाच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.”
‘बराक’ ही शॉर्ट ते मिड-रेंज हवाई संरक्षण करणारी प्रणाली असून, ती शत्रूच्या ड्रोन, क्रूझ मिसाईल्स, लढाऊ विमाने आणि समुद्रातून येणाऱ्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ही प्रणाली रडार-मार्गदर्शित (Radar-Guided) असून, एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता बाळगते.
30, 70 आणि 150 किमी अशा तीन श्रेणींमध्ये लक्ष्य भेदण्याची क्षमता
एकाचवेळी अनेक हवाई लक्ष्यांचा सामना करण्याची क्षमता
सागरी व स्थल सीमा रक्षणासाठी उपयुक्त
UAVs, cruise missiles, aircraft, ballistic missiles इत्यादी हल्ल्यांपासून बचाव
इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेत अनेक स्तरांची संरक्षण प्रणाली आहे जसे की:
Iron Dome – कमी श्रेणीतील रॉकेट्ससाठी
Arrow Missile System – दीर्घ श्रेणीतील बॅलिस्टिक मिसाईल्ससाठी
Barak System – मध्यम श्रेणीतील विविध हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी
भारताने देखील अलीकडेच हरियाणाच्या सिरसा येथे झालेल्या "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान पाकिस्तानी ‘Fatah-II’ या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राला अडवण्यासाठी बराक प्रणालीचा यशस्वी वापर केला होता. दिल्लीला लक्ष्य करणाऱ्या या क्षेपणास्त्राला हवेतच निष्प्रभ करण्यात आले होते.
दरम्यान, ‘बराक’ प्रणालीचा यशस्वी वापर इस्रायल व भारतासाठी तांत्रिकदृष्ट्या मोठे यश मानले जात आहे. ही प्रणाली भविष्यातील हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.