

Israel Elections Double Envelope Votes: इस्रायल निवडणुकीत कोण सरकार बनवणार याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. तर विरोधी आघाडीला देखील बहुमताचा आकडा मिळवणे कठीण झालं आहे. आता सर्वांची नजर ही डबल एन्व्हलोप मतांवर आहे. या मतांच्या मोजणीनंतर जागांचे गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता कोणाचं सरकार बनणार हे आतापर्यंत निश्चित झालेलं नाही.
इस्त्रायल संसदेला नेसेट म्हटलं जातं. यात एकूण १२० सीट आहेत. सरकार स्थापन करायला किमान ६१ जागा जिंकणे गरजेचं आङे. नेतन्याहूंच्या नेतृत्वातील आघाडीकडे ५३ जागा आहेत तर विरोधी आघाडी कडे ४८ जागा आहेत. अरब दलांना १९ जागा मिळण्याच्या अंदाज आहे. जर विरोधी अन् अरब अशी युती झाली तर हा आकडा ६७ पर्यंत पोहचतो मात्र या दोघांमध्ये राजनैतिक मतभेद आहेत.
नेतन्याहूंनी अरब पक्षांसोबत युतीला देश विरोधी ठरवलं आहे. तर आईजनकोट गट देखील अरब पक्षांसोबत सरकार तयार करण्याच्या मताचा नाहीये. नेतन्याहू आणि आईजनकोट एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात डबल एन्व्हलोप मतांची मोजणी दोन्ही गटांसाठी महत्वाची मानली जात आहे.
डबल एन्व्हलोप मत हे जे मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान टाकू शकले नाहीत त्यांचे मत असते. यात सैनिक, जेलमध्ये बंद मतदार, मेडिकल स्टाफ, काही आजारी लोक आणि विदेशात असलेले इस्त्रायलचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. या मतदारांचे मत वेगळ्या प्रक्रियेद्वारे घेतलेले असते.
या मतांना डबल एन्व्हलोप अऱ्थात दोन लिफाफ्याच्या प्रक्रियेतून मोजले जाते. यात मतदाराची ओळख आणि त्याचे मत यांची तपासणी केली जाते. यामागचा एखादा व्यक्ती दोनवेळा मत टाकू नये हा यामागचा उद्येश असतो. ओळख आणि गरजेची अशी तपासणी झाल्यानंतरच या मतांची मोजणी करून ती सामील करून घेतली जातात.
निवडणूक आयोगाच्या मते जवळपास ६ लाख डबल एन्व्हलोप मतांची मोजणी बाकी आहे. या तपासणीनंतर निकालात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र किती मोठा फरक पडेल याचा अंदाज आता लावणे शक्य नाही. विशेष म्हणजे अजून सामान्य मतांची मोजणी पूर्णपणे संपलेली नाही. काही मतदान केंद्रावर निकालांची तपासणी होत आहे. या मतांना आता मोठं महत्व आलं आहे. जर काही पक्षांच्या जागा वाढू किंवा कमी होऊ शकता. त्या गोष्टी सरकार बनवण्याच्या चर्चांवर प्रभाव टाकू शकतात. मात्र फक्त डबल एन्व्हलोप मतांवर सरकार ठरेल असं म्हणणे घाईचे ठरले.