US Iran conflict | इराणने शांतता करार पाळला नाही तर पुन्हा युद्ध: अमेरिकेच्‍या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

US Iran conflict | आमचे सैन्य सज्ज, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाची प्रतीक्षा
US Iran conflict
अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ.File Photo.
Published on
Updated on

US Iran conflict

वॉशिंग्‍टन : इराणने शांतता करार मान्य केला नाही, तर पुन्हा एकदा युद्ध सुरू होऊ शकते. इराणकडे तडजोड करण्याची संधी आहे, परंतु जर त्यांनी ती फेटाळली तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई सुरू करेल. अमेरिकन फौजा पूर्णपणे तयार असून कोणत्याही क्षणी 'कॉम्बॅट ऑपरेशन' (लष्करी मोहीम) सुरू करू शकतात. अमेरिकन सैन्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत असून, निर्देश मिळताच कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी दिला आहे.

नौदल नाकेबंदी सुरूच राहणार

हेगसेथ यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणवरील नौदल नाकेबंदी सुरूच ठेवेल. अमेरिका आपले धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्‍यान, अमेरिकन जनरल डॅन केन यांनी सांगितले की, आतापर्यंत नाकेबंदीमुळे १३ जहाजे परतली आहेत. यापैकी बहुतांश जहाजे नाकेबंदीच्या सीमेच्या आत पोहोचल्यानंतर परतली, तर एका जहाजाने आधीच आपला मार्ग बदलला.

US Iran conflict
Iran Us War| अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री; ट्रम्पवर स्तुतीसुमने उधळणाऱ्या मुनीर यांच्याकडे मोठी जबाबदारी

अमेरिका-इराण शांतता कराराच्या उंबरठ्यावर

२१ एप्रिल रोजी संपणाऱ्या शस्त्रसंधीपूर्वी (Ceasefire) अमेरिका आणि इराण कराराच्या जवळ पोहोचत आहेत. अमेरिकन मीडियानुसार, दोन्ही बाजूंमधील चर्चेत प्रगती झाली आहे, तरीही काही मुद्द्यांवर अद्याप मतभेद कायम आहेत.दरम्यान, तेहरानमध्ये इराणी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख अासिम मुनीर यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. मुनीर यांनी इराणमध्ये पोहोचून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली असून, ते अमेरिकेचा संदेश घेऊन गेल्याचे समजते. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत.

US Iran conflict
US Iran war: अमेरिकेच्या लष्करप्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी; इराणसोबतच्या युद्धादरम्यान ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news