

Iran - US Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या एअरबेसवर हल्ला केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा एअरबेस इराणच्या दक्षिण पूर्व भागातील शहरात होता. या एअरपोर्टचा काही भाग हा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कॉर्म्स करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराण आता अमेरिकेसोबत युद्धविराम आणि डीलसाठी तरसत आहे. ते म्हणाले की, 'इराणकडून काही वेळापूर्वीच फोन आला होता. ते डील करण्यासाठी याचना करत होते. मला माहिती नाही की ते या लायकीचे आहेत की नाही. ते डीलचे पालन करणार की नाही हे देखील माहिती नाही. त्यांच्यासोबत समस्या आहे.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून कोणी फोन केला होता याबाबत मात्र कोणती माहिती दिली नाही. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की होर्मुझमध्ये व्यावसायिक जहाजांवर हल्ला झाला आहे. त्यामुळं आता अमेरिकेचे लष्कर इराणच्या ठिकाणांवर २० पट अधिक हल्ले करणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी खार्ग बेटावर कब्जा करण्याची धमकी देखील दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'जे काही होईल ते अत्यंत वेगानं होईल. अमेरिकेचे लष्कर सर्व नष्ट करू शकते.' ट्रम्प यांचे हे वक्तव्य त्यांनी बुधवारी केलेल्या इराणसोबतचा अंतरिम करार रद्द झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर आलं आहे.
मंगळवारी होर्मुझमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात पुन्हा एखदा तणाव वाढला आहे. बुधवारी अमेरिकेने इराणच्या ८० शहरांवर मिसाईल हल्ला केला होता. त्यानंतर इराणने पलटवार केला होता. गुरूवारी देखील अमेरिकेने इराणच्या चाबहार, कोनरक, बंदर अब्बास आणि सिरिक शहरांवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने कुवैत आणि बहरीनवर इराणने मिसाईल हल्ला केला होता.
इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बाघेरी बलीबाफ यांनी अमेरिका आणि इराणच्या नव्या संघर्षानंतर होर्मुझ फक्त इराणच्या व्यवस्थेअंतर्गत खुलं होणार असं सांगितलं आहे. त्यांनी अमेरिका अजून देखील शिकला नाही. दादागिरी करून आणि आपले वचन तोडण्याचे परिणाम भोगावे लागतात. मी स्पष्ट करतो की जर तुम्ही हल्ला कराल तर तुमच्यावर देखील हल्ले होतील.