Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार

इराणने मित्र देश असलेल्या पाकिस्तानला १० कलमी प्रस्ताव पाठवला
Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार
Published on
Updated on

Iran rejects US negotiations

इस्लामाबाद : शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि ईरान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात ईरानने पाकिस्तान आणि अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. सध्या या चर्चेत सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.

काय म्‍हणाले इराणच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले की, " इराण अद्याप अमेरिकेसोबतच्या या चर्चेसाठी कोणताही विचार केलेला नाही." विशेष म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम संपण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार
Iran US Conflict: चर्चा फिसकटल्यानंतर इराणचे शिष्टमंडळ जीव मुठीत घेऊन पोहचलं तेहरानमध्ये; इस्लामाबादमध्ये नेमकं काय घडलं?

पाकिस्तानच्या मध्यस्थीवर शंका

इराणनने चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. नव्या फेरीसाठी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे संकेत इराणने दिले आहेत. मात्र, असे असले तरी आपला मित्र देश असलेल्या पाकिस्तानला इराणने १० कलमी प्रस्ताव पाठवला आहे.

Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार
trump iran ultimatum |'नरक कोसळेल...' : ट्रम्प यांचा पुन्‍हा एकदा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम

अमेरिका-इस्रायलला इशारा

'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक इशारा दिला आहे की, अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा कोणतेही आक्रमक पाऊल उचलले, तर आमचे सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देईल. अमेरिका आपल्या अनुभवातून काहीच शिकत नाहीये आणि याचे परिणाम कधीही चांगले होणार नाहीत," असे बघाई यांनी स्पष्ट केले. तसेच, मुख्य मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानला या सर्व उल्लंघनांची माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार
Strait of Hormuz firing | हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार

काय आहे पाकिस्तानचा 'प्लॅन'?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या तुलनेत यावेळी पाकिस्तानचे उद्दिष्ट दोन्ही देशांना दीर्घकाळ चर्चेच्या टेबलावर बसवून ठेवण्याचे आहेएखाद्या तात्पुरत्या करारावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत ही चर्चा सुरू राहावी, असा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. या सामंजस्य करारावर सहमती झाल्यास दोन्ही देशांना दीर्घकालीन शांतता करारासाठी सुमारे ६० दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळू शकतो.

Iran US talks | शेवटच्या क्षणी इराणचा पाकिस्तानला मोठा झटका! अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार
Abbas Araghchi Israel Hit List: भारताला 'सेफ पॅसेज' देणारे परराष्ट्रमंत्रीही होते इस्त्रायलच्या रडारवर... पाकमुळं घेतली माघार

इस्लामाबादच्या 'निष्ठे'वर प्रश्नचिन्ह

इराणला आता पाकिस्तानच्या निष्ठेबद्दल शंका वाटू लागली आहे. पाकिस्तान निष्पक्ष राहण्याऐवजी अमेरिका आणि सौदी अरेबियाकडे झुकत असल्याची भीती इराणला आहे. यातच भर म्हणून, अमेरिकन नौदलाने इराणी मालवाहू जहाजे जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात इराणी बंदरांच्या नाकाबंदीनंतर अमेरिकेने केलेली ही पहिली मोठी कारवाई आहे. यामुळेच दुसऱ्या फेरीच्या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की, अमेरिकन वार्ताकार सोमवारी (दि. २०) पाकिस्तानला रवाना होतील. या घोषणेनंतर बुधवारी संपणाऱ्या युद्धविरामाची मुदत वाढण्याची आशा निर्माण झाली होती, मात्र इराणच्या भूमिकेने आता सर्व गणिते बदलली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news