US-Israel-Iran War: कोण आहेत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा? ज्यांच्या नियुक्तीने इस्रायल आणि अमेरिकेची झोप उडाली!

Mojtaba Khamenei new supreme leader of Iran: इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्याचा अधिकार असलेल्या धर्मगुरूंच्या मंडळाने रविवारी मध्यरात्री मोज्तबा यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
Mojtaba Khamenei new supreme leader of Iran
Mojtaba Khamenei new supreme leader of Iranfile photo
Published on
Updated on

Mojtaba Khamenei new supreme leader of Iran

तेहरान: अमेरिका-इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाची, मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्याचा अधिकार असलेल्या धर्मगुरूंच्या मंडळाने रविवारी मध्यरात्री हा निर्णय जाहीर केला.

या मंडळाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, मोज्तबा खामेनी यांची निर्णायक मतांनी निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे वृत्त सरकारी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Mojtaba Khamenei new supreme leader of Iran
Iran Israel War : इराणचे गल्फ देशांवर ड्रोन-मिसाईल हल्ले

कोण आहेत मोज्तबा खामेनी?

१९६९ मध्ये मशहद येथे जन्मलेले मोज्तबा हे अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव आहेत. त्यांचे बालपण अशा काळात गेले जेव्हा त्यांचे वडील इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या विरोधात धार्मिक क्रांतीचे नेतृत्व करत होते. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब इराणच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आले. मोज्तबा यांनी तेहरानमधील प्रतिष्ठित 'अलवी हायस्कूल'मधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कोम शहरात कट्टरपंथी धर्मगुरुंच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक शिक्षण घेतले. मात्र, अयातुल्ला या सर्वोच्च धार्मिक पदापर्यंत ते पोहोचले नव्हते, ज्यामुळे त्यांच्या पात्रतेवर वरिष्ठ धर्मगुरुंमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे, इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी 'हबीब बटालियन'मध्ये सेवा बजावली होती, जिथे त्यांचे संबंध देशाच्या गुप्तचर यंत्रणेतील बड्या नेत्यांशी आले.

वंशवादाच्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता

मोज्तबा यांची नियुक्ती ही १९७९ च्या क्रांतीनंतरची पहिलीच अशी घटना आहे, जिथे सत्ता वडिलांकडून पुत्राकडे हस्तांतरित झाली आहे. इस्लामिक प्रजासत्ताक इराणने सुरुवातीला शाहच्या वंशपरंपरागत राजवटीला विरोध केला होता. आता त्याच देशात सर्वोच्च पद एकाच कुटुंबात राहिल्याने अंतर्गत स्तरावर वादाची ठिणगी पडण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

विश्लेषकांच्या मते, मोज्तबा यांचा खरा प्रभाव इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली संघटनेशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे वाढला आहे. इराणच्या राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेत या संघटनेची मोठी भूमिका मानली जाते.

२०१९ मध्ये अमेरिकेने मोज्तबा खामेनी यांच्यावर निर्बंध घातले होते. अमेरिकेचा आरोप होता की, अली खामेनी यांनी आपल्या काही अधिकारांची जबाबदारी मुलाकडे सोपवली होती आणि ते कोणत्याही सार्वजनिक उत्तरदायित्वाशिवाय निर्णय प्रक्रियेत सक्रिय होते.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, मोज्तबा यांच्या नियंत्रणाखाली मोठे गुंतवणूक जाळे असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या एकूण संपत्तीचा नेमका आकडा सार्वजनिक नसला तरी विविध देशांमध्ये मालमत्ता आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक त्यांनी केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

किती सामर्थ्यवान आहेत नवे 'सुप्रीम लीडर'?

मोज्तबा खामेनेई यांच्याकडे आता अफाट अधिकार असतील. ते इराणच्या सशस्त्र दलांचे 'कमांडर-इन-चीफ' असतील. 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' वर त्यांचे थेट नियंत्रण असेल. परराष्ट्र धोरण, संरक्षण, अणू कार्यक्रम आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल.

Mojtaba Khamenei new supreme leader of Iran
Iran Israel War : इस्रायलचे तेहरानमधील तेलसाठ्यांवर हल्ले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news