Iran Israel War : इराणचे गल्फ देशांवर ड्रोन-मिसाईल हल्ले

कुवेत विमानतळ अन्‌‍ बहरीनमधील जलप्रकल्पाला नुकसान
Iran Israel War
इराणचे गल्फ देशांवर ड्रोन-मिसाईल हल्लेPudhari
Published on
Updated on

तेहरान, दुबई : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या व्यापक हवाई कारवाईनंतर सुरू झालेल्या संघर्षाचा परिणाम आता संपूर्ण गल्फ प्रदेशात दिसू लागला आहे. रविवारी इराणने कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, यूएई आणि कतार यांसह अनेक गल्फ देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांना लक्ष्य करण्यात आले, तर बहरीनमधील पाण्याच्या डीसॅलिनेशन प्रकल्पाला नुकसान झाले. कुवेतच्या अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या सीमेजवळ कर्तव्य बजावत असताना दोन सीमा रक्षकांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.

कुवेतच्या सैन्याने सांगितले की, ड्रोनद्वारे कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांवर हल्ला करण्यात आला. कुवेत न्यूज एजन्सीनुसार विमानतळावर लागलेली आग लवकरच नियंत्रणात आणण्यात आली आणि कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. तथापि, काही ठिकाणी हवाई संरक्षण यंत्रणांनी केलेल्या अडथळ्यांनंतर पडलेल्या अवशेषांमुळे नागरी इमारतींना किरकोळ नुकसान झाले. ड्रोन आणि मिसाइलच्या वाढत्या धोक्यामुळे कुवेतच्या राष्ट्रीय तेल कंपनीने खबरदारी म्हणून कच्च्या तेलाचे उत्पादन काही प्रमाणात कमी करण्याची घोषणा केली आहे.

बहरीनमध्ये जलप्रकल्पावर हल्ला

बहरीनच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की, इराणी ड्रोन हल्ल्यामुळे देशातील एका पाण्याच्या डीसॅलिनेशन प्रकल्पाचे नुकसान झाले. तथापि, या घटनेमुळे पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे राष्ट्रीय कम्युनिकेशन कार्यालयाने स्पष्ट केले. याच दरम्यान, मिसाईलचे अवशेष पडल्यामुळे मुहर्रक भागातील एका विद्यापीठाच्या इमारतीचे नुकसान झाले आणि तीन जण जखमी झाले. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी रविवारी 33 ड्रोन अडवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news