Iran Israel US conflict |इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हल्ल्यात ठार, 'होर्मुझ' बंद करण्यात होती महत्त्वाची भूमिका

Iran Israel US conflict | अधिकार्‍यांच्या हवाल्याने इस्रायली प्रसार माध्यमांचा दावा
Iran Israel US conflict |इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हल्ल्यात ठार, 'होर्मुझ' बंद करण्यात होती महत्त्वाची भूमिका
Published on
Updated on

Iran Israel US conflict

जेरुसलेम: इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हे बंदर अब्बास येथे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत, असा दावा इस्रायली अधिकार्‍यांच्या हवाल्याने इस्रायली प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, या हल्ल्याबाबत इराण किंवा इस्रायली लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्‍यान, 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) नाकेबंदी करण्यासाठी तांगसिरी प्रामुख्याने जबाबदार होते.

कोण होते अलीरेझा तांगसिरी?

तांगसिरी हे इराणच्या अशा मोजक्या वरिष्‍ठ नेत्यांपैकी एक होते. आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायलने केलेल्‍या हल्‍ल्‍यात ते बाचवले होते. नौदल कमांडर म्‍हणून २०१८ पासून ते कार्यरत होते. इराणच्या नौदल रणनीतीत आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात त्‍यांची महत्त्वाची भूमिका होती.

Iran Israel US conflict |इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हल्ल्यात ठार, 'होर्मुझ' बंद करण्यात होती महत्त्वाची भूमिका
Iran Us War| अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री; ट्रम्पवर स्तुतीसुमने उधळणाऱ्या मुनीर यांच्याकडे मोठी जबाबदारी

लारिजानी यांच्‍या मृत्‍यूने इराण प्रशासनाला मोठा धक्‍का

२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या अनेक बड्या कमांडरना अमेरिका-इस्रायलने लक्ष्य केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अली खामेनी यांचे मुख्य सल्लागार अली लारिजानी यांची झालेली हत्या हा इराणी प्रशासनासाठी मोठा धक्का होता. लारिजानी यांच्याकडे दांडगा अनुभव आणि बाह्य जगाशी वाटाघाटी करण्याचे कौशल्य होते. आता लारिजानी आणि इतर नेत्यांची जागा घेणारे नवे चेहरे अधिक 'कट्टरपंथी' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Iran Israel US conflict |इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हल्ल्यात ठार, 'होर्मुझ' बंद करण्यात होती महत्त्वाची भूमिका
Iran Israel US War Update: आमच्या 'या' तीन अटी मान्य करा युद्ध थांबवतो... इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं ट्विट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news