Iran US conflict 2026: "पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य नाही"; इराणच्या खासदाराने जाहीरपणे काढले वाभाडे

एका इराणी खासदाराने सुरू असलेल्या प्रादेशिक वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर शंका व्यक्त केली आहे.
Iran US conflict 2026
Iran US conflict 2026file photo
Published on
Updated on

Iran US conflict 2026

तेहरान: इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "पाकिस्तान हा इराणचा चांगला शेजारी आणि मित्र असला, तरी तो एक निष्पक्ष मध्यस्थ होऊ शकत नाही," अशा शब्दांत इराणचे खासदार इब्राहिम रेझाही यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले आहे. पाकिस्तान नेहमीच अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पाकिस्तान निष्पक्ष नाही...

इराणच्या 'नॅशनल सिक्युरिटी अँड फॉरेन पॉलिसी कमिशन'चे प्रवक्ते आणि खासदार इब्राहिम रेझाही यांनी 'X' वर आपली भूमिका मांडली. मध्यस्थ हा पूर्णपणे तटस्थ असावा लागतो, मात्र पाकिस्तान नेहमीच एका बाजूला झुकलेला असतो, असे रेझा यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, "पाकिस्तान उघडपणे अमेरिकेवर टीका करणे टाळतो. लेबनॉनचा प्रश्न असो किंवा इराणची गोठवलेली मालमत्ता, अमेरिकेने आपली आश्वासने पाळली नाहीत यावर पाकिस्तान कधीही भाष्य करत नाही. अशा स्थितीत पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश ठरू शकत नाही."

Iran US conflict 2026
US Iran proposal | पाकिस्तानचे दलालीचे धंदे!

इराणी खासदारांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची वाटाघाटी जिवंत ठेवण्यासाठी धावपळ करत आहेत. अराघची यांनी गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा इस्लामाबादचा दौरा केला. तिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. ओमानच्या सुलतानांशी चर्चा केल्यानंतर अराघची पाकिस्तानात दाखल झाले होते.

या चर्चेत प्रामुख्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा व्यवस्था, इराणवर लादलेले सागरी निर्बंध उठवणे, लष्करी कारवायांविरुद्धची हमी आणि नुकसानभरपाई, या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

ट्रम्प यांचे थेट चर्चेचे आवाहन

दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमधील संवाद मंदावलेला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट चर्चेचे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "इराणला चर्चा करायची असेल, तर ते स्वतःहून आमच्याशी संपर्क साधू शकतात. आमचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे सुरक्षित टेलिफोन लाइन्सही आहेत. त्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा."

अमेरिकेने पाकिस्तानात होणारी चर्चेची फेरी रद्द केल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अराघची आता रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून, तेहरान आपल्या मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Iran US conflict 2026
Viral Video Pakistan: हसावे की रडावे! पाकचे उपपंतप्रधान स्वागताला गेले अन् इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोरच पडले, पाहा Video

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news