Iran Mssile Attack |इराणने दिले अमेरिकेला प्रत्युत्तर : कतारमधील दोहा येथील लष्‍करी तळावर डागली ६ क्षेपणास्त्रे

इराणच्या अणु केंद्रांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रत्युत्तरात कारवाई
Iran Mssile Attack
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली :अमेरिकेने रविवारी इराणवर केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍याला प्रत्‍यूत्तर म्‍हणून आज इरणाने अमेरिकेच्या कतार येथील लष्‍करी तळांवर हल्‍ला केला. त्‍यांनी एकून ६ मिसाईल डागली असल्‍याचे समोर आले आहे. हा हल्‍ला इराणने कतारमधील अल उदेद हवाई तळावर अमेरिकन सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला. अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रत्युत्तर म्‍हणून ही कारवाई करण्यात आली आहे. इराणने सरकारी टेलिव्हिजनवर या हल्ल्याची घोषणा केली. टेलिव्हिजनवर इरणाने म्‍हटले आहे की अमेरिकन आक्रमणाला एक शक्तिशाली . प्रत्‍युत्तर दिले आहे. दरम्‍यान कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले त्याच वेळी हा हल्ला झाल्‍याचे समोर येत आहे.

'इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर सहा क्षेपणास्त्रे डागली'

दुसरीकडे, इराकी माध्यमांनी सोमवारी रात्री वृत्त दिले की इराकमधील ऐन अल-अस या अमेरिकन हवाई तळावर इराणने सहा क्षेपणास्त्रे डागली आहेत. तर कतारची राजधानी दोहामध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्चिम इराकमधील ऐन अल-असद तळावरील अमेरिकन सैन्याचे हवाई संरक्षण वाढवण्यात आले आहे

Iran Mssile Attack
US attack Iran | अमेरिकेने कसे राबवले ऑपरेशन 'मिडनाईट हॅमर'? एका युक्तीमुळे इराण राहिला गाफिल; अवघ्या 25 मिनिटांत...

मे महिन्यात ट्रम्प यांनी दिली होती भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात कतारच्या अल उदेद हवाई तळाला भेट दिली. येथे अमेरिकन सैनिकांशी बोलताना ते म्हणाले, ‘माझी प्राथमिकता संघर्ष सुरू करणे नाही तर तो संपवणे आहे’ पण गरज पडल्यास, मी अमेरिकन शक्ती वापरण्यास कधीही मागेपुढे पाहणार नाही, कतार हा आमच्या प्रमुख मित्रांपैकी एक आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते की जेव्हा आपल्याला धोका असतो तेव्हा अमेरिकन सैन्य त्यांच्या शत्रूंना न डगमगता प्रत्युत्तर देईल. आपल्याकडे प्रचंड शक्ती आणि विध्वंसक शक्ती आहे. आता त्‍याच हवाई तळाावर हल्‍ला करुन अमेरिकेला इरणाने जोरदार प्रत्‍यूत्तर दिले आहे. कतारची राजधानी दोहामध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

Iran Mssile Attack
US attack Iran | अमेरिकी हल्ल्याचे भारतावर दूरगामी परिणाम शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news