Iran Israel war: मध्यपूर्वेत महायुद्ध भडकले! इराणचा इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ला; इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर

इराणने थेट इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केला. ८ एप्रिल रोजी झालेल्या युद्धबंदीनंतर इराणने इस्रायलवर केलेला हा पहिलाच थेट लष्करी हल्ला आहे.
Iran Israel war
Iran Israel warfile photo
Published on
Updated on

Iran Israel war

तेहरान: रविवारी रात्री इराणने थेट इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केला. ८ एप्रिल रोजी झालेल्या युद्धबंदीनंतर इराणने इस्रायलवर केलेला हा पहिलाच थेट लष्करी हल्ला आहे. इस्रायली सैन्याने बेरूतच्या दक्षिण उपनगरांवर तीव्र हवाई हल्ले केल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणने ही आक्रमक कारवाई केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून, सोमवारी पहाटे इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत.

इस्रायलमध्ये धोक्याचे इशारे; हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क

रविवारी रात्री इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे समजताच उत्तर इस्रायलसह अनेक भागांत धोक्याचे सायरन वाजले. इस्रायली संरक्षण दलाने याबाबत माहिती देताना सांगितले की, "इराणकडून इस्रायलच्या दिशेने आलेली क्षेपणास्त्रे आमच्या रडार यंत्रणेने टिपली असून, ती हवेतच नष्ट करण्यासाठी आमची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय करण्यात आली आहे." इस्रायली हवाई दलाने इराणची सर्व क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या पाडल्याचा दावा केला असून, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

Iran Israel war
US-Iran Israel War|इस्रायल नष्ट होईपर्यंत मध्य पूर्वेत शांतता नांदणार नाही : इराणने युद्धाच्या आगीत ओतले तेल

बेरूतवरील हल्ल्याचा इराणकडून बदला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात अंशतः युद्धबंदी जाहीर झाली होती. मात्र, दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच ठेवल्याने ही युद्धबंदी त्याच दिवशी मोडीत निघाली. रविवारी इस्रायलने हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेरूतच्या दक्षिण उपनगरावर जोरदार बॉम्बहल्ला केला. "बेरूतवर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही," असा इशारा इराणने आधीच दिला होता. त्यानुसार हा हवाई हल्ला झाल्यानंतर काही तासांतच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली.

'रामत डेव्हिड' हवाई तळाला केले लक्ष्य

या हल्ल्यानंतर इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स'ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. इराणच्या एरोस्पेस फोर्सने इस्रायलच्या 'रामत डेव्हिड' या प्रमुख हवाई तळाला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"इस्रायलने बेरूतच्या निवासी भागांवर हल्ले करून आणि दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी कारवाया वाढवून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जर इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवले नाहीत किंवा इराणच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना यापेक्षाही अधिक विनाशकारी आणि अत्यंत क्लेशदायक परिणामांना सामोरे जावे लागेल."
-कमांडर, खातम अल-अंबिया फोर्स (इराण)

इस्रायलचे प्रत्युत्तर

इराणच्या 'इरना' या वृत्तसंस्थेनुसार, देशभरातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलने राजधानी तेहरान तसेच इस्फाहान, तब्रिज आणि पश्चिम इराणमधील इतर भागांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. उत्तर इस्रायलवरील इराणी हल्ल्याला प्रत्युत्तर न देण्याचा सल्ला ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिला होता. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांचा सल्ला मान्य केल्याचे वृत्त होते; तरीही, इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

Iran Israel war
US-Iran war | सैद्धांतिक भ्रमांचे सावट युद्धबंदीवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news