

Iran Drone Attack Hormuz: इराणच्या लष्करी दलानं स्ट्रेट ऑफ हार्मुझमधून जात असलेल्या एका कंटेनर जहाजावर गुरूवारी ड्रोनने हल्ला केला. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महत्वाच्या जलमार्गावरील शिपिंग ट्रॅफिक पुन्हा मूळपदावर आणण्याच्या प्रयत्नांची ही पायमल्ली आहे.
इराण स्ट्रेट ऑफ हार्मुझवर आपले नियंत्रण असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासातच हा हल्ला झाला आहे. इराणने त्यांच्या हद्दीतूनच तेल आणि नैसर्गिक गॅसची वाहतूक करता येणार असा इशारा दिला होता. अनेक शिप या होर्मुजच्या दक्षिणेकडील ओमीनी कोस्टजवळून आपली जहाजे बाहेर काढत होती.
त्यानंतर इराणने एका टँकर जहाजावर ड्रोनने हल्ला करत होर्मुजमधील सर्वच ट्रॅफिक थांबवलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण होर्मुझवर नियंत्रण ठेवू शकत नाही असा दावा केला होता. त्याच्या विरूद्ध घटना आता होर्मुझमध्ये घटत आहेत. मात्र या हल्ल्यानंतर तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत ब्रंट क्रूड ऑईल हा तेलाच्या किंमतीचा ग्लोबल बेंचमार्क आहे. त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता हा दर प्रती बॅरल हा ७५ डॉलरवर गेला आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमेडियट क्रुड आईलचे दर देखील २ टक्क्यांनी वाढून ते ७२ डॉलर प्रती बॅरलला पोहचले आहेत.
अमेरिकेचे अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर या स्ट्राईक संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, या तेलवाहू कंटेनरवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळं आंतरराष्ट्रीय मेरिटाईम ऑर्गनायजेशन, युनायटेड नेशनची एजन्सी यांनी शेकडो खलाश्यांना बाहेर काढण्याची आपली पोहीसम झांपवली आहे. हे सर्व खलाशी पर्शीयन गल्फमध्ये शिपवर अडकून पडले आहेत.
या हल्ल्याचा अमेरिका आणि इराण यांच्यात स्ट्रेट ऑफ होर्मुझवर कोणाचे नियंत्रण यावरून सुरू असलेल्या चर्चेवर काय परिणाम होईल याची स्पष्टता अजून मिळालेली नाही. सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रूबियो यांनी गुरूवारी अरब नेत्यांची भेट घेतली.
इराणच्या IRGC ने यापूर्वीच होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिला होता. त्यांनी प्रत्येक जहाजाने त्यांच्या नेव्हीशी संपर्क केल्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग घेऊ नये असं सांगितलं होतं. त्यांचा इशारा हा ओमानी हद्दीतून जाणाऱ्या मार्गाकडे होता. हा इशारा त्यांनी अनेक महिन्यापासून या मार्गातून कमी झालेली जलवाहतून वाढल्यानंतर दिला होता.
IRGC ने 'हा मार्ग (ओमानच्या हद्दीतील मार्ग) अमान्य आणि अत्यंत धोकादायक आहे असं गुरूवारी सांगितलं होतं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरजीसीने, 'आम्ही सर्व तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना कडक वॉर्निंग देऊ इच्छितो की दिलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गावरून वाहतूक केली आमच्या सुचनांचे पालन केलं नाही तर आम्ही त्या व्हेसलविरूद्ध कारवाई करू.' असा इशाला दिला होता.