American soldiers killed: इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्कराचं नुकसान! पेटगॉननं ४ जवानांचे फोटो केले प्रसिद्ध

Iran Drone Attack On US Base : चार जवानांची ओळख पटली मात्र अजून काही जवानांची ओळख पटवणे अजून बाकी
American soldiers killed
American soldiers killedpudhari photo
Published on
Updated on

Iran Drone Attack On US Base:

पेंटगॉनने रविवारी इराणच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची ओळख पटवली आहे. या हल्ल्यात कॅप्टन कोडी खोर्क, सार्जंट फर्स्ट क्लास नोआ टिटजेस, सार्जंट फर्स्ट क्लास निकोल अमोर आणि सार्जंट डेक्लान कोडी यांचा समावेश आहे. या चार जवानांना आयोवाच्या एका आर्मी रिजर्व्ह सस्टेनमेंट युनिट 103rd सस्टेनमंट कमांडमध्ये तैनात करण्यात आलं होतं. रविवारी झालेल्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अजून दोन सैनिकांची ओळख अजून पटलेली नाही. (American soldiers killed In Iran Drone Attack)

American soldiers killed
Israel Iran War Impact: रेश्माला बघितल्याशिवाय जीव भांड्यात पडणार नाही

1st थिएटर सस्टेनमेंट कमांडचे डेप्युटी कमांडिंग जनरल ब्रिगेडियर जनरल क्विंट ए बार्न्स यांनी मंगळवारी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, 'खूप दुःखाने आणि वेदनेनं आम्ही आमच्या सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत आहे. या सैनिकांनी देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. आमचे सैनिक न थांबता सलग आणि धाडसी होऊन, मन लावून गर्वानं आपली सेवा करत होते.' (Iran Israel War)

American soldiers killed
Iran Israel War : युद्धामुळे भारतापुढे निर्माण होणारे प्रश्न

बार्न्स यांनी सांगितलं की, 'आमचे सैनिक स्वातंत्र्याचे दूत होते. ते आमच्या देशाची सर्वात चांगली बाजू दाखवत होते. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आठवणींमध्ये शांती देवो. आम्ही त्यांना कधी विसरणार नाही.'

American soldiers killed
Israel Iran Conflict: इराणची ‌‘मोझॅक स्ट्रॅटेजी‌’ अमेरिकेसाठी ठरणार चक्रव्यूह

रविवारी कुवैतमध्ये शुआईबा पोर्टमधील एक तातपुरत्या टॅक्टिकल ऑपरेशन सेंटरवर इराणने हल्ला केला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक मारले गेले होते. त्यात 1st थिएटर सस्टेनमेंट कमांडमध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना आपला जीव गमवावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news