US Iran War: पाकिस्तानचे मालवाहू जहाज इराणनं अडवलं... परवानगी नाही म्हणत परत पाठवलं

US Iran War
US Iran Warpudhari
Published on
Updated on

US Iran War: इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्ष थांबवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ दिवसांचे सीज फायरची घोषणा केली आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षाला स्वल्पविराम देण्यासाठी पाकिस्तान महत्वाची भूमिका पार पाडत आहे असे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत.

US Iran War
Pakistan Afghanistan Conflict: अफगाणिस्ताननं पाकिस्तानचं F-16 पाडलं...? मुनीर तोंडावर आपटले, ४० पाकिस्तानी ठार

मात्र कच्च्या तेलाच्या एका एका थेंबासाठी तरसत असलेल्या पाकिस्तानला इराणने पाकिस्तानला जोर का झटका दिला आहे. पाकिस्तानची मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधूनीमधून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी इराणने त्यांचा हे जहाज अडवले. इराणने आवश्यक परवानगी घेतली गेलेली नाही म्हणत हे जहाज परत पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार आयआरजीसी नेव्हीने सेलेन नावाचं जहाज थांबवलं. त्यांना आवश्यक कायदेशील प्रोटोकॉल्स पाळले नाहीत म्हणून थांबवण्यात आलं आहे.

US Iran War
Trump On Pakistan Afghanistan War: मी मध्यस्थी करतो मात्र... अफगाण - पाकिस्तान खुल्या युद्धात ट्रम्प कोणाच्या बाजूने?

तांगसिरी यांनी सांगितलं की प्रत्येक जहाजानं हार्मुझ इथं प्रवेश करण्यापूर्वी इराणच्या प्रशासनाशी संपूर्ण सहकार्य करायला हवं. पाकिस्तानी जहजाविरूद्ध उचलेलं पाऊल हे इराणच्या समुद्र हद्दीचे सार्वभौमत्व जपण्यासाठी उचलण्यात आलं आहे. अशा प्रकारची कारवाई ही लोकांच्या पाठिंब्यामुळंच करता आली आहे असं देखील सांगण्यात आलं. जगातील सर्वात महत्वाच्या व्यापारी समुद्री मार्गावर इराणचे असलेले नियंत्रण अधोरेखित करणारी ही घटना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news