

Iran Attacks US Airbase: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा फिसकटल्याचे दिसून येत आहे. त्यातच इराणच्या IRGC ने अब्बास पोर्टवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला असून तिकडे कुवैतचे संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या दिशेने दागलेल्या मिसाईल्स आणि डोन्सना थोपवण्यात आल्याचे सांगितलं.
तसनीम वृत्त एजन्सीनुसार इराणच्या IRGC ने गुरूवारी सांगितलं की स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.५० ला अब्बास पोर्टजवळ झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. एका अमेरिकी एअरबेसला टार्गेट करण्यात आलं. IRGC ने कोणत्या अमेरिकी एअरबेसला टार्गेट करण्यात आलं हे मात्र सांगितलेलं नाही.
इराणच्या IRGC ने अमेरिकेला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. त्यांनी जर या प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर तर इराणकडून यापेक्षाही भीषण आणि निर्णायक प्रतिक्रिया देण्यात येईल. याच्या गंभीर परिणामांची जबाबदारी फक्त हल्लेखोर अमेरिकेची असेल.
इराणने केलेल्या या हल्ल्याचा प्रभाव शेजारी देशांवर स्पष्टपणे पडताना दिसत आहे. या क्षेत्रात अचानक धोका वाढला असून कुवैतने अधिकृतपणे आपल्या एअर स्पेसमधून जाणारी मिसाईल, ड्रोन इंटरसेप्ट केली असून ती हवेतच नष्ट करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं.
बुधवारी रात्री अमेरिकेने इराणच्या हद्दीत एक मोठा हवाई हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास रात्री १.३० वाजता इराणचे बंदर अब्बास शहराच्या पूर्व भागात तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.
एका अमेरिकी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं की अमेरिकेच्या लष्कराने रात्री इराणमध्ये नव्याने हल्ले केले आहेत. यात एका लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलं. अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये अमेरिकी लष्कर आणि व्यावसायिक समुद्री वाहतुकीला धोका पोहचवत असलेल्या जहाजावर कारवाई करण्यात आली. हा हल्ला आत्मरक्षणाच्या दृष्टीकोणातून केला गेला असं सांगण्यात आलं.