Indonesia Pakistan JF17 Deal: भारताचं ब्रम्होस अन् पाकिस्तानंच फायटर जेट... या मुस्लीम देशाला नेमकं करायंचय तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशिया पाकिस्तानकडून JF-17 थंडर मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट विकत घेण्याचा विचार करत आहे.
Indonesia Pakistan JF17 Deal
Indonesia Pakistan JF17 Dealpudhari photo
Published on
Updated on

Indonesia Pakistan JF17 Deal Talk: इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री साफरी समसुद्दीन यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानी वायूसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांची भेट घेतली. त्यावेळी इंडोनेशिया पाकिस्तानकडून फायटर जेट्स विकत घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली. विशेष म्हणजे इंडोनेशियाची भारतासोबत ब्रम्होस सुपरसोनिक क्रुज मिसाईलची जवळपास ४५० मिलियन डॉलर्सची डील अंतिम टप्प्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून JF-17 थंडर मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट विकत घेण्याचा विचार करत आहे.

Indonesia Pakistan JF17 Deal
Commonwealth Countries |पाकिस्तान, बांगलादेश राष्ट्रकुल देशांच्या संसदीय कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत

४० लढाऊ विमानांचा प्रस्ताव

बैठकीदरम्यान पाकिस्तानने इंडोनेशियासमोर ४० जेएफ १७ लढाऊ विमाने देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जेएफ - १७ लढाऊ विमान हे पाकिस्तान आणि चीनने संयुक्तरित्या विकसित केलं आहे. मात्र ही डील भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कारण इंडोनेशिया हा चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याला रोखण्यासाठी महत्वाचा भागीदार देश आहे. त्यामुळे इंडोनेशिया, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वाढते सैन्य सहकार्य भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. इंडोनेशिया हा लोकसंख्येच्या दृष्टीकोणातून जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश आहे.

Indonesia Pakistan JF17 Deal
Pakistan accepts 7 facts: ब्रम्होस पासून नूर खान एअरबेसपर्यंत.... ऑपरेशन सिंदूरनंतर ७ महिन्यांनी पाकिस्ताननं ७ सत्य स्विकारलीत

भारताची चींता वाढवण्याचे अजून एक कारण म्हणजे इंडोनेशिया पाकिस्तान मेड कॉम्बेट ड्रोन देखील खरेदी करण्याबाबत विचार करत आहे. याचबरोबर बांगलादेशचे हवाई दल देखील पाकिस्तानसोबत संरक्षण करार करण्याचा विचार करत आहे. ते जेएफ १७ विमान खरेदी करण्याबाबत चर्चा करत आहे. जाणकारांच्या मते पाकिस्तानच्या मदतीनं या भागात चीनी बनावटीची शस्त्रे आक्रमकपणे विकण्याची ही रणनिती आहे.

Indonesia Pakistan JF17 Deal
New Hyundai Venue: 'फायटर जेट'सारखी रस्त्यावर धावणार SUV! न्यू ह्युंदाई वेन्यू' चे अनावरण; जाणून घ्या सर्व फीचर्स

पाकिस्तानवर १५ ब्रम्होस मिसाईल सोडली

गेल्या वर्षी पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षावेळी म्हणजेच ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने सू - ३० एमसकेआय लढाऊ विमानातून जवळपास १५ ब्रम्होस मिसाईल पाकिस्तानच्या सीमेपार फायर केली होती. त्यातील पाकिस्तानच्या १२ पैकी ११ एअरबेसचे मोठे नुकसान झाले होते. यात नूर खान, रफीकी, सरगोधा, जैकोबाबाद, भोलारी आणि स्कार्दू एअर बेसचा समावेश होता.

३०० किलोमीटर रेंज आणि मॅक ३ पेक्षा जास्त वेगाची रामजेट स्वयंमचलीत फायर अँड फरगॉट ब्रम्होस मिसाईलने पाकिस्तानची चीनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टम भेदली होती. या हल्ल्यात रडार स्टेशन, कमांड सेंटर, शस्त्रसाठी आणि रनवे नष्ट करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानची प्रतिकार करण्याची हवाई ताकदच नष्ट झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी देखील भारताचा हा हल्ला पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतानाच झाला. त्यामुळे लष्कराला मोठा धक्का बसला.

Indonesia Pakistan JF17 Deal
Bribery Case : संरक्षण उत्पादन विभागातील लेफ्टनंट कर्नलला लाच घेताना अटक; घरातून २.३६ कोटींची रोकड जप्त

इंडोनेशिया-भारत संबंधांवर परिणाम

जाणकारांच्या मते इंडोनेशियाने पाकिस्तानकडून जेएफ १७ लढाऊ विमाने घेण्याचा विचार करणे म्हणजे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील विश्वास कमी होण्यासारखे आहे. यामुळे या भागातील संरक्षण समिकरणे अजून गुंतागुंतीची होऊ शकतात.

भारत आणि इंडोनेशिया हे ब्रम्होस सारखी स्ट्रॅटेजिक संरक्षण डील अंतिम स्वरूपात आणत असताना पाकिस्तानसोबतची दुसरी डील विश्वासा तडे देऊ शकते. गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण चर्चवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्र्यांमध्ये ब्रम्होस डीलवर सकारात्मक चर्चा झाली होती. जर ही डील झाली तर फिलिपिन्सनंतर ब्रम्होस मिसाईल खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा दक्षिण आशियाई देश बनणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news