भारताचे पराग अग्रवाल बनले ट्वीटरचे नवे सीईओ; जॅक डॉरसी यांचा राजीनामा

भारताचे पराग अग्रवाल बनले ट्वीटरचे नवे सीईओ; जॅक डॉरसी यांचा राजीनामा
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ट्वीटरच्या सीईओ जॅक डॉरसी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंट वरुन आपले राजीनामा पत्र शेअर केले आहे. त्यांच्या जागी आता मूळचे भारतीय असणारे पराग अग्रवाल यांना ट्वीटरचे नवे सीईओ बनविण्यात आले आहे.

ट्वीटरने सांगितले आहे की, जॅक डॉरसी हे २०२२ पर्यंत सोशल मीडियाच्या मंडळात कायम राहतील. पराग अग्रवाल यांनी त्यांची जागा घेतली आहे. ४५ वर्षांचे जॅक डॉरसी पेमेंट कंपनी स्क्वॉवयरचे देखिल प्रमुख आहेत. ते ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक देखिल होते. पराग अग्रवाल यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉरसी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे, मी ट्वीटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्यावर माझ्रा पूर्ण विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांचे कौशल्य, परिश्रम आणि कामप्रति वचनबद्धता यावर मी खूपच प्रभावित आहे.

जॅक डॉरसी हे पेमेंट्स कंपनी स्क्वॉवयर इंकचे प्रमुख आहेत. शिवाय त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून क्रिप्टोंकरन्सीमध्ये लक्ष घातले आहे. डॉरसी यांनी २००८ मध्ये सुद्धा सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. पण, २०१५ मध्ये ते पुन्हा परतले. डॉरसी यांनी एक वर्षापूर्वी म्हटले होते की, मला दक्षिण आफ्रिकेमधील इंटरनेट युजर्स यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. यासाठी मला दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा महिने राहण्याची इच्छा आहे. पण, कोविडच्या कारणामुळे त्यांची ही योजना सत्यात उतरु शकली नाही.

पराग अग्रवाल यांना २०१७ मध्ये कंपनीचे सीटीओ बनविण्यात आले होते. तसेच ते आता मंडळाचे सदस्य देखिल असणार आहेत. पराग अग्रवाल हे ऑक्टोंबर २०११ ते ऑक्टोंबर २०१७ पर्यंत ट्वीटरमध्ये विशेष सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदी कार्यरत होते. यानंतर त्यांना कंपनीचे सीटीओ बनविण्यात आले. याशिवाय त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहू सारख्या कंपनीमध्ये काम केले आहे.

आयआयटी बॉम्बे मधून कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी घेतली आहे. तसेच २००५ ते २०१२ या कालावधीमध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापिठातून कॉम्प्युटर सायन्समधून पीएचडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news