Canada shooting | कॅनडात भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या, ४ महिन्यांत ४ भारतीयांचा मृत्यू

कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती, त्याचदरम्यान झाला गोळीबार
Canada shooting
हरसिमरत रंधावा.(source-X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडात दोन गटांतील गोळीबारादरम्यान एका २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरसिमरत रंधावा असे तिचे नाव आहे. ती बस स्टॉपवर वाट पाहत असताना दोन वाहनांतून एकमेकांवर गोळीबार झाला. या घटनेदरम्यान एक गोळी हरसिमरतला लागली. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे हॅमिल्टन पोलिसांनी सांगितले. ती ओंटारियोमधील हॅमिल्टन येथील मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी आहे. गेल्या चार महिन्यांत कॅनडामध्ये मृत्युमुखी पडलेली ती चौथी भारतीय आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, रंधावा ही एक निर्दोष प्रत्यक्षदर्शी होती. तिचा गोळी लागून मृत्यू झाल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे.

"भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्ही खूप दुःख झालो आहोत. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती एका घटनेचा निष्पाप बळी ठरली. दोन वाहनांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक गोळी लागून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरू आहे. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत," असे भारतीय वाणिज्य दूतावासाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हॅमिल्टन पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, अप्पर जेम्स आणि साउथ बेंड रोड रस्त्यांजवळ गोळीबाराची घटना घडली. रंधावा हिच्या छातीवर गोळी लागली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला.

या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाच्या कारमधील व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या सेडानमधील व्यक्तींवर गोळीबार करताना दिसतो. या गोळीबारानंतर दोन्ही वाहने घटनास्थळावरून निघून गेली. या घटनेदरम्यान कारमधून झाडलेल्या गोळ्या जवळच्या एका घराच्या खिडकीलाही लागल्या. पण, यात कोणीही जखमी झालेले नाही.

Canada shooting incidents| कॅनडात गेल्या ४ महिन्यांत ४ भारतीयांचा मृत्यू

  • कॅनडातील याआधी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता. आता चार महिन्यांनी ही घटना घडली.

  • १ डिसेंबर २०२४ रोजी, पंजाबच्या लुधियाना येथील २२ वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थी गुरासिस सिंगची तो रहात असलेल्या भाड्याच्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

  • पंजाबमधील आणखी एक २२ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी रितिका राजपूत हिचा शेकोटी पेटवताना अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला होता. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

  • ६ डिसेंबर रोजी एडमंटनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय भारतीय वंशाच्या हर्षदीप सिंगची एका गँगने गोळ्या घालून हत्या केली होती.

Canada shooting
अपहरण, अमानुष मारहाण..., बांगलादेशात हिंदू नेत्याची भयंकर छळ करून हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news