Apple new COO : 'अ‍ॅपल'च्‍या 'सीओओ'पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती

गेली तीस वर्ष कंपनीत कार्यरत, जेफ विल्‍यम्‍स यांच्‍याकडून पदभार स्‍वीकारणार
Apple new COO : 'अ‍ॅपल'च्‍या 'सीओओ'पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती
Published on
Updated on

अ‍ॅपल इन्कॉर्पोरेटेडने भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी व कंपनीतील दीर्घकालीन वरिष्ठ पदाधिकारी सबिह खान यांची मुख्य संचालन अधिकारी(Chief Operating Officer ) पदी नियुक्ती झाली आहे. सबिह खान हे जेफ विल्यम्स यांच्यानंतर हे पद भूषवणार आहेत. सध्या वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून कार्यरत असलेले खान गेली ३० वर्षे अ‍ॅपलसोबत कार्यरत आहेत. या महिन्याच्या अखेरीस औपचारिकपणे ते 'सीओओ'पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद ते ॲपल्‍सचे 'सीओओ'

सबिह खान यांचा जन्म १९६६ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. शालेय शिक्षणाच्या काळातच त्यांचे कुटुंब सिंगापूरमध्ये स्थायिक झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी ते अमेरिकेत गेले. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि यांत्रिक अभियांत्रिकी या दोन विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी न्यूयॉर्कच्या रेन्सीलेअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (RPI) येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

Apple new COO : 'अ‍ॅपल'च्‍या 'सीओओ'पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती
Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? 'ॲपल'ला दिला 'हा' अनाहूत सल्‍ला

३० वर्षांचा अ‍ॅपलसोबतचा प्रवास

५८ वर्षीय सबिह खान गेली तीस वर्ष अ‍ॅपल कंपनीत कार्यरत आहेत. सध्या ते कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीची जागतिक पुरवठा साखळी, पुरवठादार जबाबदारी कार्यक्रम आणि विविध ऑपरेशन्स टीम्स यांचे नेतृत्व ते करत आहेत.कंपनीच्या निवेदनानुसार, याच महिन्यात जेफ विल्यम्स यांच्याकडून सबिह खान या पदाचा कार्यभार स्वीकारतील. विल्यम्स हे CEO टिम कुक यांना रिपोर्ट करत राहतील, तसेच डिझाईन टीम आणि अ‍ॅपल वॉच विभागाची जबाबदारी त्‍यांच्‍यावर असेल.

Apple new COO : 'अ‍ॅपल'च्‍या 'सीओओ'पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती
Trump Apple iPhone tariff: भारतात आयफोन उत्पादन बंद करा, नाहीतर 25 टक्के टॅरिफ भरावा लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'ॲपल'ला इशारा

अ‍ॅपलमधील कारकीर्द आणि योगदान

सबिह खान १९९५ मध्ये अ‍ॅपलच्या खरेदी विभागात दाखल झाले. कंपनीच्‍या वेबसाइटनुसार, नावीन्यपूर्ण उत्पादनांची डिलिव्हरी वेळेवर सुनिश्चित करणे, जागतिक ऑपरेशन्स धोरण ठरवणे, आणि पुरवठा साखळीचे रूपांतर करणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे. २७ जून २०१९ रोजी त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी थेट जेफ विल्यम्स यांना रिपोर्ट करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात अ‍ॅपलने हरित तंत्रज्ञानासोबत भागीदारी निर्माण केली तसेच कोविड-१९ महामारीच्या काळात पुरवठादारांच्या कार्यपद्धतींमध्ये आवश्यक बदल केले.

Apple new COO : 'अ‍ॅपल'च्‍या 'सीओओ'पदी भारतीय वंशाचे सबिह खान यांची नियुक्‍ती
Job & Career : ॲपल सोबत काम करायची इच्छा आहे? मग हे गुण तुमच्याकडे आवश्यक

कंपनीच्या पुरवठा साखळीचे मुख्य शिल्पकार : टिम कुक यांचे गौरवोद्गार

अ‍ॅपलचे CEO टिम कुक यांनी सबिह खान यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना त्यांना कंपनीच्या पुरवठा साखळीचे मुख्य शिल्पकार म्हणून गौरविले आहे. खान यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅपलने प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामध्ये नवकल्पना केली आणि अमेरिकेतील उत्पादन साखळीचा विस्तार केला, असे कुक यांनी नमूद केले. सबिह हे एक विलक्षण रणनीतिकार असून, अ‍ॅपलच्या पुरवठा साखळीचे प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांनी अ‍ॅपलसाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले, अमेरिकेतील उत्पादन केंद्रांचा विस्तार साधला आणि जागतिक आव्हानांना तोंड देताना कंपनीला लवचिक बनवले, पर्यावरणीय शाश्वततेच्या क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वामुळे अ‍ॅपलच्या कार्बन उत्सर्जनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असेही कुक म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news