

Pakistan Foreign Minister : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तान भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यातील नागरी भागात ड्रोन हल्ले करत आहे. हे सर्व हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडले आहे. तसेच पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तरही दिले आहे. , आम्हाला तणाव वाढवायचा नाही. मात्र पाकिस्ताने हल्ले सुरु ठेवले तर मोठी कारवाई करावी लागेल, असा इशारा भारतीय सैन्य दलाने दिला आहे. या निर्वाणीच्या इशार्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. पाकिस्तान लवकरच भारतासमोर नमते घेणार, असे त्यांच्या विधानावरुन स्पष्ट होत आहे.
परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानमधील जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, भारताने सध्याची परिस्थिती पाहता पुढे पाऊल टाकले नाही तर पाकिस्तानही तणाव कमी करण्यास सुरुवात करेल. दार यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हा संदेश त्यांनाही दिला.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा स्थापित करण्याचे मार्ग ओळखावेत यावर सचिव रुबियो यांनी भर दिला. भविष्यातील वाद टाळण्यासाठी त्यांनी रचनात्मक संवादात अमेरिकेला मदत करण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, एस जयशंकर यांनी रुबियो यांना सांगितले की, परिस्थिती चिघळवण्याच्या पाकिस्तानच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल.
व्हाईट हाऊसने शुक्रवारी म्हटले होते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील तणाव "शक्य तितक्या लवकर" कमी करायचा आहे. पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीहे स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत. एस जयशंकर यांनी रुबियो यांना सांगितले की, परिस्थिती चिघळवण्याच्या पाकिस्तानच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल.