Hackers Hack Refrigerator: काय सांगता... हॅकर्सनी फ्रिजचा 'शस्त्रासारखा' केला वापर, हॅक करून तापमान पोहचवलं ५० डिग्रीपर्यंत

फ्रान्समध्ये हा सायबर अटॅक झाला असून हॅकर्सनी सुपर मार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान ५० डिग्रीपर्यंत वाढवून ठेवलं.
Hackers Hack Refrigerator
Hackers Hack Refrigeratorpudhari
Published on: 
Updated on: 

Cyber Attack in France: सायबर अटॅकचा एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक असा प्रकार समोर आला आहे. यात हॅकर्सनी मोबाईल लॅपटॉप किंवा पीसी नाही तर थेट फ्रीज हॅक केला. सुपर मार्केटमधील सर्व रेफ्रिजरेशन सिस्टमच हॅक करून मोठं नुकसान करण्यात आलं. (Hackers Hack Refrigerator)

मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये हा सायबर अटॅक झाला असून हॅकर्सनी सुपर मार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान ५० डिग्रीपर्यंत वाढवून ठेवलं. त्यामुळं खाण्या पिण्याच्या अनेक गोष्टी खराब झाल्या. तसेच काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या घटनेनंतर इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या डिवाईस किंवा मशिनच्या सायबर सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Hackers Hack Refrigerator
Anthropic AI Cyber Attack On Chatgpt: AI चा AI वर हल्ला... एंथ्रोपिकने ChatGPT ला केलं हॅक; अख्ख जग टेन्शनमध्ये

घटना कुठं झाली

इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्समधील इंटरमोर्शे, कॅरेफोर आणि कोऑपरेटिव यू सारख्या सुपरमार्केट चेन स्टोअरवर हा हल्ला करण्यात आला. काही रिपोर्ट्सनुसार हा सायबर हल्ला शेकडो स्टोअर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या तापासात डेन्मार्कची कंपनी डॅनफोसच्या रिफ्रिजरेशन मॅनेजमेंट सिस्टमशी जोडली गेलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या सायबर अटॅकच्या मागे कोण होता आणि ते या सिस्टमपर्यंत तो कसा पोहचला याची माहिती समोर आलेली नाही.

Hackers Hack Refrigerator
Cyber Attack on Dams: अलमट्टी, केआरएस, तुंगभद्रासह राज्यातील अनेक जलाशयांवर सायबर हल्ला

कसं वाढवलं तापमान?

मोठमोठ्या सुपर मार्केटमध्ये शेकडो फ्रीज आणि फ्रिजर असतात. त्यांचे तापमान कंट्रोल करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी डिजीटल कंट्रोल सिस्टमचा वापर केला जातो. या सिस्टमच्या मदतीने कर्मचारी एकाच ठिकाणावरून सर्व मशिनचे तापमान नियंत्रित करतात. गरज पडली तर त्यात बदल करू शकतात. ही व्यवस्था काम सोपं करण्यासाठी राबवली जाते. मात्र जर ही यंत्रणा सुरक्षित नसेल तर असा सायबर अटॅक होऊ शकतो. जर सायबर अटॅक करणाऱ्यांची पोहोच सॉफ्टवेअर कंट्रोल किंवा युनिटपर्यंत निर्माण झाली तर ते मशिन अर्थात रेफ्रिजरेटर हॅक करू शकतात.

Hackers Hack Refrigerator
Heathrow airport cyber attack | लंडनच्या हिथ्रो विमानतळांवर सायबर हल्ला

डिफ्रोस्टचा वापर

सुरूवातीच्या तपासात फोर्स्ड डिफ्रोस्ट अर्थात बर्फ वितळवणाऱ्या फिचरचा वापर या हॅकिंगमध्ये केला गेला. फ्रिज आणि फ्रीजरच्या इव्हॅपोरेटर बर्फ वितळवण्यासाठी वापरला जातो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र ही सिस्टम चुकीच्या पद्धतीनं वापरली आणि ती जास्त वेळ अॅक्टिव्ह ठेवली तर कूलिंग प्रभावित होतं. रिपोर्टमध्ये काही मशिनचे तापमान हे ५० डिग्रीपर्यंत गेलं होतं. हे तापमान सहा तास तसंच ठेवण्यात आलं होतं. प्रत्येक स्टोअरमध्ये एकाच प्रकारे हल्ला केला गेला की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news