

Anthropic AI Cyber Attack On Chatgpt: आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात AI ने अख्ख्या जगाला धडकी भरवणारी गोष्ट केली आहे. आता AI अन् मनुष्याच्या संघर्षाची भीती असतानाच AI ने AI लाच चांगला धडा शिकवल्यानं सगळे आश्चर्यचकित झाले आहेत. चॅट जीपीट तयार करणाऱ्या ओपन AI आणि एथ्रोपिक यांच्यातील हे प्रकरण आहे.
सायबर रिसर्चरने ओपन एआयला हॅ करणाऱ्यासाठी त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी एथ्रोपीकच्या सॉफ्टेवेअरचा वापर केला. या हँकिंगनंतर चॅट जीपीटी तयार करणाऱ्या ओपन एआयच्या सध्याच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सायबर सुरक्षा रिसर्चर्सच्या एका छोट्या ग्रुपने OpenAI च्या चॅटब़ चॅट जीपीटीचे एक एकाऊंट हँक केलं. हे अकाऊंट चॅट जीपीटीच्या एका कर्मचाऱ्याचे होते. हॅकिंगनंतर या अकाऊंटवरील सर्व मेसेज हा रिसर्च ग्रुप वाचू शकत होता. ही माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने शेअर केली आहे.
या हॅकिंगासाठी Anthropic च्या एका खास टूलचा एक्सेस देण्यात आला होता. हे टूल खासकरून सायबर सुरक्षा प्रोफेशनल्ससाठी तयार केलं जातं.
सायबर रिसर्चच्या टीमने हे काम एका खास प्रोग्रामअंतर्गत केलं. त्या प्रोग्रामचा उद्येश हा सुरक्षेबाबतच्या त्रुटी शोधणे हा होता जेणेकरून त्या दूर केल्या जातील. मात्र आता ओपन AI च्या मॉडेलमध्ये एवढ्या लवकर एखादी सिस्टम घुसते यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगातील शक्तीशाली AI मॉडेलची सुरक्षा कमकुवत सिद्ध होत असून जर कोणत्या तरी हँकिंग ग्रुपच्या हाती जर हे टूल्स लागले तर ते खूप भयावह होऊ शकतं.