

Giorgia Meloni Voice Trademark: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युरोपीयन इंटलक्चुअल प्रोपर्टी ऑफिसमध्ये आपल्या आवाजाचे ट्रेडमार्क करण्यासाठी अर्ज केला आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी हे पाऊल AI जनरेटेड डीपफेक व्हिडिओविरूद्ध लढण्यासाठी उचललं असून पुढच्या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेडमार्क अर्ज हा चार सेकंदाच्या व्हाईस सॅम्पलसह करण्यात आला आहे. यात जॉर्ज मेलोनी म्हणतात की, 'मी जॉर्जिया मेलोनी असं दोनवेळा म्हणतात. सोमवारी हा अर्ज सादर करण्यात आला असून तो अजून अंडर प्रोसेस आहे.
या अर्जामुळे आता मेलोनी यांनी प्रसिद्ध व्यक्तींचा आवाज क्लोन करून AI चा वापर करून त्याचा गैरवापर करण्याऱ्यांविरूद्धच्या कायदेशीर लढाईला जागतिक स्तरावर प्रारंभ केला आहे.
फक्त मेलोनी यांनी असा अर्ज केलेला नाही तर टेलर स्विफ्ट, इटालियन गायक गिसी फेरारी यांनी देखील आपला आवाज ट्रेडमार्क करण्यासाठी अर्ज केला आहे. मेलोनी या बहुदा पहिल्या राजकारणी आहेत ज्यांनी आपला आवाज ट्रेडमार्क करण्यासाठी अर्ज केला आहे.
इटलीमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मेलोनी यांनी ही तयारी केली आहे. मेलोनी या दुसऱ्या टर्मसाठी मैदानात उतरणात आहेत. त्यांना सेंटर लेफ्ट आणि अत्यंत उजव्या अशा दोन्ही विरोधी पक्षांकडून आव्हान मिळत आहे. फार उजव्या पार्टीचे नेतृत्व माजी लष्करी जनरल रोबेर्टो व्हानोस्सी करत आहेत.
इटलीमध्ये आता निवडणूक प्रचार सुरू होणार असून यंदाचा निवडणूक प्रचार हा अनेक दृष्टीकोणातून 'ब्लडी' होणार आहे. हा प्रचार पातळी सोडून होणार हे मात्र नक्की आहे. असे मत रोमेस लुईसी विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्स विभागाचे प्रमुख ओरसिना यांनी व्यक्त केलं.