UN Gaza report: मानवतेला कलंक! दोन पोती पिठासाठी मुलींचा सौदा, बलात्कार करणाऱ्यांशीच विवाह; गाझामधील महिलांची धक्कादायक कहाणी

अन्नाच्या बदल्यात मुलींचा सौदा करणे, अल्पवयीन मुलींची जबरदस्तीने लग्न लावणे, तसेच बलात्कार करणाऱ्यांशीच विवाह करण्यास महिलांना भाग पाडणे, अशा गंभीर घटना गाझामध्ये घडत आहेत.
Women violence Gaza
Women violence GazaFile Photo
Published on
Updated on

UN Gaza report

जेरुसलेम: अन्नाच्या बदल्यात मुलींचा सौदा करणे, अल्पवयीन मुलींची जबरदस्तीने लग्न लावणे, तसेच बलात्कार करणाऱ्यांशीच विवाह करण्यास महिलांना भाग पाडणे, अशा गंभीर घटना गाझामध्ये घडत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीने (UNFPA) गाझामधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार, २०२६च्या पहिल्या तिमाहीत गाझामध्ये अल्पवयीन आणि जबरदस्तीच्या विवाहांच्या घटनांमध्ये तब्बल १२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, लिंगाधारित हिंसाचाराच्या एकूण घटनांपैकी ६८ टक्के पीडित १८ ते ५९ वयोगटातील महिला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Women violence Gaza
Iran Mock Donald Trump: तेलुगू चित्रपटातील क्लीप शेअर करून इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचलं

अन्नासाठी मुलींचा सौदा

इस्त्रायल-हमास युद्धामुळे निर्माण झालेल्या गंभीर मानवतावादी संकटाच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी अनेक महिलांशी संवाद साधला. यावेळी काही महिलांनी धक्कादायक अनुभव सांगितले. अल्पवयीन मुलींचे बलात्कार करणाऱ्यांशीच लग्न लावून दिले जात असल्याचे, अन्नाच्या बदल्यात मुलींचा सौदा केला जात असल्याचे आणि काही पालकांनी मुलींची जबाबदारी घेण्यास असमर्थ असल्याने त्यांना सोडून दिल्याचे या महिलांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गाझामध्ये महिलांवरील लिंगाधारित हिंसाचारामध्ये मानसिक आणि भावनिक हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा तसेच जबरदस्तीचे आणि अल्पवयीन विवाह यांचा समावेश आहे.

आश्रयस्थळांमध्येही असुरक्षितता

युद्धामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना गर्दीच्या आणि अपुऱ्या सुविधांच्या आश्रयस्थळांमध्ये राहावे लागत आहे. अन्न, पाणी, स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा आणि कपडे यांसारख्या गरजेच्या वस्तूंची कमतरता असल्याने महिला आणि पुरुषांवरील मानसिक ताण वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बलात्कारांनंतर विवाहांचे सोहळे

संयुक्त राष्ट्रांच्या आणखी एका अहवालात गाझा शहर आणि खान युनिस येथील शरणार्थी छावण्यांमधील धक्कादायक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या भागातील सुमारे २३० महिलांनी त्यांचे भयानक अनुभव सांगितले. शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या आश्रयस्थळांमध्ये राहणाऱ्या एका बलात्कारपीडित महिलेने सांगितले की, सामाजिक कलंक आणि बदनामी टाळण्यासाठी महिलांना अनेकदा बलात्कार करणाऱ्यांशीच लग्न करण्यास भाग पाडले जाते. 'शाळांमध्ये बलात्काराच्या घटना घडल्या की, दुसऱ्याच दिवशी तिथे लग्न आणि त्यानंतर उत्सव सुरू होतो,' असे या महिलेने सांगितल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन पोती पीठासाठी १४ वर्षांच्या मुलीचे लग्न

एका अन्य महिलेने आणखी एक धक्कादायक घटना सांगितली. एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांच्या मुलीचे लग्न केवळ दोन पोती पीठ मिळण्याच्या बदल्यात लावून दिले. मुलगी आणि इतर मुलांना अन्न मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे तिने सांगितले.

Women violence Gaza
Donald Trump : "भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले" : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ट्रम्प यांचा पुनरुच्चार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news