Modi Melody Gift Meloni: मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना खास ‘Melody’ टॉफी गिफ्ट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Modi Melody Gift Meloni: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात जॉर्जिया मेलोनी यांना खास ‘Melody’ टॉफी भेट दिली. मेलोनी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
Modi Melody Gift Meloni
Modi Melody Gift MeloniPudhari
Published on
Updated on

PM Modi Gifts Melody Toffee to Giorgia Meloni, Video Goes Viral: इटली दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना एक खास आणि हटके भेट दिली आहे. मोदींनी मेलोनी यांना भारतातील लोकप्रिय ‘Melody’ टॉफी गिफ्ट केली असून, या गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मेलोनी यांनी स्वतः या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “Thank you for the gift,” असं लिहित त्यांनी ही पोस्ट शेअर केली. त्यानंतर #Melodi हा हॅशटॅग पुन्हा चर्चेत आला आहे.

‘Melodi’ हॅशटॅगपासून ‘Melody’ टॉफीपर्यंत

गेल्या काही वर्षांत जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटींनंतर सोशल मीडियावर #Melodi हा हॅशटॅग लोकप्रिय झाला होता. ‘Meloni’ आणि ‘Modi’ यांच्या नावांपासून तयार झालेला हा शब्द दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचं प्रतीक मानला जाऊ लागला.

यावेळी मोदींनी याच ट्रेंडला मजेशीर ट्विस्ट देत मेलोनींना ‘Melody’ टॉफी भेट दिली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी याला “स्मार्ट डिप्लोमसी” आणि “चॉकले डिप्लोमसी” असं नाव दिलं आहे.

इटली दौऱ्यावर महत्त्वाच्या चर्चा

पंतप्रधान मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात इटलीत आहेत. या दौऱ्यात भारत-इटली व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Modi Melody Gift Meloni
Meta Layoffs 2026: सकाळी डोळे उघडले आणि नोकरी गेल्याचा मेल आला; मेटाकडून 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात सुरु

‘रोममध्ये काशीची झलक’

इटली दौऱ्यात मोदींनी रोममधील भारतीय संस्कृतीशी असलेल्या एका खास नात्याचीही झलक शेअर केली. त्यांनी इटालियन चित्रकार ज्याम्पाओलो तोमासेत्ती यांची भेट घेतली. भारतीय संस्कृती आणि वाराणसीवर आधारित त्यांच्या कलाकृती मोदींना भेट देण्यात आल्या.

मोदींनी सांगितलं की, तोमासेत्ती गेल्या चार दशकांपासून भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. त्यांनी महाभारतावर आधारित 23 मोठी चित्रंही तयार केली आहेत.

Modi Melody Gift Meloni
Salman Khan Video: मध्यरात्री सलमान खान संतापला; हिंदुजा रुग्णालयाबाहेर पापाराझींना सुनावलं, रात्री 3 वाजता सलग 4 पोस्ट

नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची पहिली भेट 2022 मध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G20 Summit परिषदेत झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटी झाल्या असून, सोशल मीडियावर त्यांची मैत्री चर्चेचा विषय ठरत आली आहे. आता ‘Melody’ टॉफीच्या या भेटीनंतर भारत-इटली संबंधांमध्ये ‘गोडवा’ आणखी वाढल्याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news