

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए)मध्ये लस मंजुरी प्रक्रिया अधिक कडक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एका अंतर्गत मेमोमध्ये कोव्हिड-19 लसींचा संबंध 10 बालकांच्या मृत्यूशी जोडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव आला आहे.
तथापि, आरोग्य तज्ज्ञांनी या हालचालीला असुरक्षित आणि धोकादायक म्हणून टीका केली आहे. एफडीएच्या लस विभागाचे संचालक डॉ. विनय प्रसाद यांनी लिहिलेला 3,000 शब्दांचा एक अंतर्गत मेमो अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना मिळाला आहे. या मेमोमध्ये डॉ. प्रसाद यांनी कोवीड लसीमुळे दहा मुलांच्या मृत्यूचा दावा केला आहे.