Lawrence Bishnoi Gang: सलमानला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगविरूद्ध FBI चे 'Operation Hard ball'; जगभरात ५० ठिकाणी धाडसत्र

Lawrence Bishnoi Gang
Lawrence Bishnoi GangPudhari
Published on
Updated on

Lawrence Bishnoi Gang: अमेरिकेच्या FBI ने कुप्रसिद्ध गँग लॉरेन्स बिश्नोई गँगविरूद्ध आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन सुरू केलं आहे. FBI ने त्यांच्या सहयोगी एजन्सींसोबत मिळून ७ जुलै रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियासह जगभरातील अनेक ठिकाणी मोठं ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत २० लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून बंदी असलेलं सामान, ड्रग्ज आणि शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

Lawrence Bishnoi Gang
Kargil War 1999 Story: भारतीय सेनेच्या कर्नलने आधी केली तुफान फायरिंग... नंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला का दिली कॅडबरी?

ऑपरेशनला ऑपरेशन हार्ड बॉलचं नाव

एफबीआयने या आंतरराष्ट्रीय क्राईम सिंडिकेटच्या विरूद्ध सुरू केलेल्या ऑपरेशनला ऑपरेशन हार्ड बॉल असं नाव दिलं. एफबीआय आणि त्यांच्या एजंट्सच्या नेतृत्वात अमेरिका, कॅनडा आणि युरोपात जवळपास ५० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात बंदी घातलेलं सामान जप्त करण्यात आलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त करण्यात आलं आहे.

Lawrence Bishnoi Gang
India-Pak Track 2 talks: पाकिस्ताननं 'पडद्यामागील' चर्चेसाठी सैफ अली खानच्या चुलत्याला पाठवलं; भारताकडूनही दिग्गज नावांचा समावेश

गोल्डी बरार अन् जग्गू भगवानपुरियाचे नेटवर्क निशाण्यावर

या ऑपरेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा पार्टनर गोल्डी बरार आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याशी निगडीत नेटवर्क निशाण्यावर होते. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संबंधातील अनेक वॉन्टेड गँगस्टर अमेरिका, कॅनडा आणि युरोपात अवैधरित्या रहात आहेत. बिश्नोई गँगने फक्त भारतातच नाही तर या देशात देखील आपल्या गुन्हेगारी कृत्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. इथं ते खंडणी गोळा करत आहेत. ते कॅनडा, अमेरिका आणि युरोपात राहणाऱ्या भारतीयांना टार्गेट करून त्यांच्याकडून ते खंडणी वसूल करत होते.

Lawrence Bishnoi Gang
US-Iran War Update | अमेरिकेने इराणसमोर ठेवल्या ५ अटी; मोजतबा खोमेनींच्‍या निर्णयाकडे वेधले सर्वांचे लक्ष

कॅनडात दहशतवादी संघटना घोषित

कॅनडा सरकारने गेल्या वर्षी लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई अनेक वर्षे अमेरिकेत लपून बसला होता. अमेरिकेत असताना त्याने मुंबईतील एनसीपी नेता बाबा सिद्दिकी यांची हत्या केली होती. तसचे सलमान खानच्या घरावर फायरिंग देखील केली होती. त्यानंतर त्याला अमेरिकेत अटक करून भारतात डिपोर्ट करण्यात आलं आहे.

Lawrence Bishnoi Gang
Iran US Conflict: इराणने US Army सोबतच केला मोठा कांड? ट्रम्प यांचे चौकशीचे आदेश, धक्कादायक माहिती समोर

भारतीय एजन्सींनी देखील वेळोवेळी लॉरेन्सचे नेटवर्क अमेरिका, कॅनडा आणि युरोपात पसरल्याचं सांगतात. भारतातून फरार होऊन हे सर्व मेंबर्स या देशांमध्ये आपला अड्डा बनवून आपलं गुन्हेगारी साम्राज्य चालवत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news