Everest Man : ३२ वेळा माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारा शेर्पा, जगातील पहिलाच मानव ज्याने केला हा भीमपराक्रम!

२०२६ मध्ये मोडला स्वतःचाच विक्रम, १९९४ पासून एवरेस्टवर समिट, अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न साकारणारा अवलिया, एव्हरेस्ट मॅन म्हणून जगभरात ओळख
Everest Man
कामी रीता शेर्पा
Published on
Updated on

Everest Man Kami Rita Sherpa यंदाची माऊंट एव्हरेस्ट मोहिम जगभरात चर्चिली गेली ती म्हणजे एकाच दिवशी १९ मे रोजी २७४ गिर्यारोहकांनी जगातील सर्वांत उंच शिखवरावर पाय ठेवल्याने, तशी दरवर्षी लाखो लोक आयुष्यात एकदा तरी एवरेस्टवर पाय ठेवायचा या स्वप्नासाठी प्रयत्‍न करत असतात. पण अनेकांच्या पदरी निराशाच येते. अनेक जण तर आपला जीवही गमावतात. पण या सर्व गिर्यारोहकांचे हे स्वप्न पूर्ण करतात ते म्हणजे शेर्पा. यांच्या मदतीशिवाय या अत्‍युच्च शिखरापर्यंत पोहचने कोणलाही शक्य नाही. याच शेर्पांमध्ये एक अवलिया म्हणजे कामी रीता शेर्पा. या नावाची यंदा जगभरात चर्चा झाली, कारणही अतिशय रंजक आहे. आजतागायत कोणत्‍याही मानवाला जे जमले नाही ते कामी रीता यांनी केले आहे. एक दोन नाही तर ३२ वेळा त्‍यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे.

सुर्वण अक्षरांनी कोरले नाव

वर्षीय नेपाळच्या या प्रख्यात गिर्यारोहक आणि 'एव्हरेस्ट मॅन' म्हणून ओळखले जाणारे कामी रिपा यांनी गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नाव कोरण्याची कामगिरी यंदा केली. ५६ वर्षिय कामी रीपा यांनी माउंट एका आंतरराष्ट्रीय मोहिमेचे नेतृत्व करताना ८,८४९ मीटर (२९,०३२ फूट) उंचीच्या माउंट एव्हरेस्टवर ३२ व्यांदा यशस्वी चढाई करून स्वतःचाच जुना जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

कामी रीता शेर्पा यांनी यापूर्वी ३१ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता. हा ३१ वा टप्पा त्यांनी मागील वर्षी २७ मे २०२५ रोजी गाठला होता. त्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच मे २०२६ मध्ये त्यांनी ३२ व्यांदा शिखर गाठून जागतिक गिर्यारोहण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.

१९९४ साली पहिल्यांदा कामी रीता शेर्पा सर केले शिखर

पहिली चढाई (१९९४): त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते. त्‍यांनतर ते दरवर्षी (काही अपवाद वगळता) मोहिमांचे यशस्वी नेतृत्व करत एव्हरेस्ट सर करत आले आहेत. काही वर्षांत तर त्यांनी एकाच सीझनमध्ये दोनदा चढाई करण्याचा पराक्रमही केला आहे.

कामी रीता शेर्पा यावेळी कोणासोबत गेले होते?

कामी रीता शेर्पा हे नेपाळमधील 'सेव्हन समिट ट्रेक्स' (Seven Summit Treks) या नामांकित कमर्शियल माउंटन गाईडिंग कंपनीचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत. मे २०२६ मधील या ऐतिहासिक ३२ व्या चढाईदरम्यान, ते एका आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांच्या मोहिमेचे मुख्य नेतृत्व करत होते. त्यांनी '१४ पीक्स एक्सपेडिशन' च्या माध्यमातून आलेल्या परदेशी क्लायंट्स आणि इतर शेर्पा सहकाऱ्यांच्या चमूसह ही चढाई पूर्ण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक परदेशी गिर्यारोहकांनी याच दिवशी त्यांच्यासोबत शिखर गाठले.

नेपाळची राजधानी काठमांडू येथे कामी रीता शेर्पा यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
नेपाळची राजधानी काठमांडू येथे कामी रीता शेर्पा यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले

शेर्पा समुदायाशिवाय एवरेस्टची चढाई अशक्य

अनेक लोकांना असे वाटते की 'शेर्पा' म्हणजे डोंगरावर ओझे वाहून नेणारे किंवा गिर्यारोहकांना मदत करणारे त्‍यांच्या बॅगा नेणारे ; पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शेर्पा ही नेपाळच्या हिमालयातील पर्वतीय भागात राहणारी एक विशिष्ट वांशिक जमात आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वी ते तिबेटमधून नेपाळच्या सोलुखुंबु भागात स्थलांतरित झाले. 'शेर' म्हणजे पूर्व आणि 'पा' म्हणजे लोक (पूर्वेकडील लोक). हजारो वर्षांपासून अतिउंचावर (High Altitude) राहिल्यामुळे शेर्पांच्या शरीरात जनुकीय बदल झाले आहेत. ते कमी ऑक्सिजनशिवाय उंच ठिकाणी धावू पळू शकतात

Everest Man
Mount Everest traffic jam : माऊंट एवरेस्टच्या ‘डेथ झोन‘मध्ये गिर्यारोहकांचा 'ट्रॅफिक जॅम'; एकाच दिवशी रेकॉर्ड 274 जणांची चढाई

एव्हरेस्ट मोहिमेतील त्यांचे कार्य

शेर्पा हे जगातील सर्वोत्तम गिर्यारोहक आणि मार्गदर्शक (Guides) मानले जातात. एव्हरेस्ट मोहिमेतील सर्वात धोकादायक भाग असलेल्या 'खुंबू आइसफॉल'मध्ये बर्फाच्या दऱ्यांवर शिड्या लावणे, दोऱ्या बांधणे आणि रस्ता तयार करण्याचे अत्यंत जोखमीचे काम शेर्पांचे एक विशेष पथक करते. त्यांना 'आइसफॉल डॉक्टर्स' म्हणतात.

ओझे वाहणे आणि कॅम्प उभारणे: परदेशी गिर्यारोहकांसाठी ऑक्सिजन सिलिंडर्स, तंबू (Tents), खाण्याचे सामान आणि वैद्यकीय उपकरणे उणे ४० अंश तापमानात पाठीवर वाहून नेण्याचे काम ते करतात.

लाईफ सेव्हर : हवामान खराब झाल्यास किंवा परदेशी गिर्यारोहक आजारी पडल्यास स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना पाठीवर वाहून सुरक्षित खाली आणण्याचे काम शेर्पा करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news