Mount Everest traffic jam : माऊंट एवरेस्टच्या ‘डेथ झोन‘मध्ये गिर्यारोहकांचा 'ट्रॅफिक जॅम'; एकाच दिवशी रेकॉर्ड 274 जणांची चढाई

नेपाळ सरकारवर अनेक तज्ञांकडून होतेय टीका, अनेक गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार
Mount Everest
माऊंट एवरेस्टच्या ‘डेथ झोन‘मध्ये गिर्यारोहकांचा 'ट्रॅफिक जॅम'
Published on
Updated on

Mount Everest सध्या मांऊट एवरेस्टवरील गिर्यारोहणाचा प्रश्न चर्चेत आला आहे. सध्या नेपाळमध्ये एवरेस्टवर चढाईचा मोसम सुरु आहे. दररोज काही गिर्याराहेक जगातील सर्वांत उंच शिखरावर पाय ठेवण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. पण 19 तारखेला या शिखरावरील चढाईमुळे जगभरातील गिर्यारोहण तज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. कारण 19 तारखेला 274 गिर्यारोहक एकाच दिवशी शिखरावर चढले. रॉयटर या वृत्तसंस्थेनुसार ही एका दिवसात शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांची सर्वाधिक संख्या आहे. या गर्दीमुळे एवरेस्टवर मानवी ट्रॅफिक जॅम लागला होता.

डेथ झोनमध्ये 'ट्रॅफिक जॅम' सदृश परिस्थिती

गिर्यारोहक तज्ञानी मात्र या घटनेवर टिका केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने गिर्यारोहक 'डेथ झोन'मध्ये (Death Zone) अडकल्यामुळे तिथे मानवनिर्मित 'ट्रॅफिक जॅम' सदृश परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी एवढे गिर्यारोहक आल्यामुळे मोठी रांग लागली याठिकाणी अतिशय कमी प्रमाणात ऑक्सिजन असतो. त्‍यामुळे अशा हाय रिस्क जागेवर गिर्यारोहकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा थेट गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

अनेक तज्ञांची टिका, नेपाळने केले मान्य

या घटनेबाबत नेपाळ सरकारवर अनेक गिर्यारोहण तज्ञांनी टीका केली आहे. नेपाळ जास्त नफा कमवण्यासाठी खूप लोकांना गिर्यारोहणाची परवानगी देते. यामुळे एवरेस्टव मानवी कचरा, तसेच इतर पर्यावरणाचे नुकसान होणारे प्रकार होत आहेत. नेपाळनेही ही गोष्ट मान्य केली आहे की जगातून अनेक लोक या माऊंट एवरेस्टवर चढाईसाठी परवानगी मागतात. त्‍यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम सक्त केले आहेत तसेच फीही वाढवली आहे पण तरीही अर्जांची संख्या अनेकपटीने वाढत आहे.

नेपाळ व चिनच्या बाजूने चढाई

माउंट एवरेस्ट हे चिन व नेपाळच्या सिमेवर आहे. या शिखरावर चिनच्या बाजूनेही चढाई करता येते पण चिनच्या बाजूने चढाई अवघड असते. त्‍यामुळे अनेकजण नेपाळलाच पसंती देतात. तसेच चिनमध्ये अनेक नियम असल्यामुळे त्‍याबाजूकडून कमी चढाई होते.

'डेथ झोन' काय आहे

समुद्रसपाटीपासून ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागाला 'डेथ झोन' म्हणतात, जिथे ऑक्सिजनची पातळी कमालीची कमी असते. अशा ठिकाणी ट्रॅफिक जॅममुळे तासनतास थांबावे लागल्याने गिर्यारोहकांचा अतिरिक्त ऑक्सिजन संपतो, शरीर गोठून जाते आणि 'हाय अॅल्टिट्युड सेरेब्रल इडिमा' (HACE) सारखे गंभीर आजार होऊन मृत्यूचा धोका वाढतो.

उंची आणि गिर्यारोहणाची फी

जगातील सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एवरेस्टची ओळख आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची 8,848.86 मीटर इतकी असून. गिर्यारोहणासाठी अतिशय खडतर चढाई असते. पण जगभरात अनेक गिर्यारोहकांचे आयुष्यात एकदा तरी माऊंट एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न असते. यातूनच नेपाळमध्ये लाखोंच्या संख्येने या शिखरावर चढाईसाठी अर्ज येतात. यासाठी अतिशय कडक नियमही आहेत. एका गिर्यारोहकाला एकूण मोहिमेसाठी $४०,००० ते $९०,००० डॉलर (सुमारे ₹३५ लाख ते ₹७५ लाख) खर्च येतो. यामध्ये सर्व परवानग्या, साहित्‍य इत्‍यादी गोष्टींचा समावेश असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news